निधन वार्ता
पुंजाबाई भोकरे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(वार्ताहर)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी रघुनाथ भोकरे यांच्या मातोश्री गं.भा.पुंजाबाई रघुनाथ भोकरे यांचे बुधवार दि. १७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान वृध्दापकाळाने निधन झाले आहे.मृत्यूसमयी त्या ७८ वर्षाच्या होत्या. संवत्सर येथे गोदावरी काठावरील अमरधामध्ये गुरुवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.दरम्यान त्यांच्यामागे मुले,मुली,सुना,नातवंडे,पणतू असा मोठा परिवार आहे.

कै.गं.भा.पुंजाबाई भोकरे या अत्यंत मनमिळाऊ व धार्मिक स्वभावाच्या होत्या.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुलांचा व नातवांचा सांभाळ करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले.प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन एक यशस्वी गृहिणी म्हणून संवत्सर परिसरात त्यांनी आपला नांवलौकीक प्राप्त केला होता.
कै.पुंजाबाई यांच्या अंत्यविधीसमयी संवत्सर पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,उपसरपंच विवेक परजणे,संवत्सरच्या सरपंच सुलोचना ढेपले यांनी कै.पुंजाबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.त्यांच्या निधनाबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.



