जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

प्रेमविवाह केल्याचा राग धरून दोघाना मारहाण,तिघांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी युवकाने गत ऑगष्ट महिन्यात रामपूरवाडी येथील तरुणीशी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून आपल्यास व आपल्या सुनेस आरोपी साहेबराव भानुदास काळे,निखिल साहेबराव काळे व समाधान बाबासाहेब मनोहर या तीन आरोपी सर्व रा.रामवाडी, संवत्सर यांनी हातातील कड्याने आपल्याला रामवाडी शिवारात आपल्या दुचाकीवरून घराकडे जात असताना मारहाण केली असल्याचा गुन्हा हरिश्चंद्र उमाजी मंचरे (वय-४५) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

आपला मुलगा सचिन मंचरे याने साहेबराव काळे यांच्या मुलीशी २० ऑगष्ट रोजी प्रेमविवाह केला आहे.सदर लग्नास मुलीच्या आई वडीलांचा विरोध होता.त्यामुळे काळे कुटुंब आमच्यावर नाराज होते.पंधरा जानेवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास आपण व आपली सून असे माझ्या दुचाकीवरून (क्रं.एम.एच.१७,बी.एफ.५८१३) या आपल्या भोजडे येथील घराकडे जात असताना बुधवार दि.१५ जानेवारी रोजी भोजडे चौकीजवळ समोरून आले.त्या वेळी ते जोरजोराने आम्हाला,”धरा रे !,आता यांना जिवंत सोडू नका”असे म्हणून आमची दुचाकी रस्त्यात अडवून तिला ढकलून देऊन आम्हाला खाली पाडून साहेबराव काळे,निखिल काळे,समाधान मनोहर यांनी हातातील कड्याने मारहाण करून आपली सून निकिता हिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी हरिश्चंद्र मंचरे हे आपल्या पत्नी,दोन मुले,एक सून असे एकत्र राहतात.त्यातील एक मुलगा सचिन मंचरे याने साहेबराव काळे यांच्या मुलीशी २० ऑगष्ट रोजी प्रेमविवाह केला आहे.सदर लग्नास मुलीच्या आई वडीलांचा विरोध होता.त्यामुळे काळे कुटुंब आमच्यावर नाराज होते.पंधरा जानेवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास आपण व आपली सून असे माझ्या दुचाकीवरून (क्रं.एम.एच.१७,बी.एफ.५८१३) या आपल्या भोजडे येथील घराकडे जात असताना बुधवार दि.१५ जानेवारी रोजी भोजडे चौकीजवळ समोरून आले.त्या वेळी ते जोरजोराने आम्हाला,”धरा रे !,आता यांना जिवंत सोडू नका”असे म्हणून आमची दुचाकी रस्त्यात अडवून तिला ढकलून देऊन आम्हाला खाली पाडून साहेबराव काळे,निखिल काळे,समाधान मनोहर यांनी हातातील कड्याने मारहाण करून आपली सून निकिता हिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.त्या नंतर आपण कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात जाऊन उपचार घेऊन पुढील उपचार शिर्डी येथील संस्थानच्या रुग्णालयात घेतला असल्याचे म्हटले आहे. या नंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.२७/२०१९ भा.द.वि.कलम ३५३,३२५,३४१,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. व्ही. गवसने हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close