जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आढाव माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलनास उत्साहात प्रारंभ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेचे माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय व नगरपालिका शिक्षण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने. इयत्ता पहीली ते दहावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले आहे.

कोपरगाव नगरपरिषदेच्या माधवराव आढाव माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कला,क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांच्या संकल्पनेतून मागील वर्षांपासून क्रीडा स्पर्धा व स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते ते यावर्षीही मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
त्याचे उदघाटन विद्यालयाच्या नगरसेविका भारती वायखिंडे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करून करण्यात आले.

या प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक सत्येन मुंदडा,शालेय समिती सदस्य विजय आढाव,पी. एम.पाटील सर,प्रशासनाधिकारी माधुरी कांबळे ,पंच म्हणून श्रीमान गोकुलचंद विद्यालयाचे श्री काले,कन्या विद्या मंदिराचे श्री निकम,मुख्याध्यापक माधव जोशी,तसेच भाऊसाहेब शिंदे,नगरपरिषद प्राथमिक प्राथमिक,माध्यमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व शहरातील नागरिक,पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी पाहुण्यांना सर्व शालेय विद्यार्थ्यांनी संचलन करून मानवंदना दिली. सदरच्या स्पर्धा तीन दिवस चालणार असून यात प्रश्न मंजुषा, सांघिक मैदानी स्पर्धा,बालआनंद मेळावा, वैयक्तिक क्रीडा स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन भावना खैरनार यांनी केले तर आभार कैलास साळगट यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close