जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कुंभारीत पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कुंभारी-(प्रतिनिधी)

कोपरगांव तालुक्यातील कुंभारी येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नुकताच कुंभारी ग्रामपंचायतचे उपसरपंच दिगंबर बढे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र कुंभारी येथील आरोग्य सेवका डॉ . यु. ए . सोनवणे यांनी ० ते ५ वयोगटातील लाभार्थी ३१६ पैकी २९६ बालकांना पल्स पोलिओचे डोस देण्यात आला आहे.

पोलिओ (बालपक्षाघात) म्हणजे विषाणूमुळे येणारा लुळेपणा. हा बहुतकरून 2 वर्षाखालील मुलांना होतो. काही गरीब देशांत हा रोग टिकून आहे. सुधारलेल्या देशांमधून लसींमुळे आणि मुख्यतः राहणीमान सुधारल्याने तो नष्ट झाला आहे. पाच वर्षे वयापर्यंतच्या लस न दिलेल्या सर्व मुलांना- विशेषतः पावसाळयात याच्यापासून धोका असतो.

हा आजार झालेली ८० टक्के मुले एक ते दोन वर्षे गटातील असतात.जिथे सांडपाणी, मैला यांची नीट विल्हेवाट होत नाही व पिण्याचे पाणी अशुध्द असते. तिथे याचा धोका असतो. म्हणूनच हा रोग टाळायचा असेल तर सर्व मुलांना पोलिओ लस (डोस) देणे व पाणी शुध्द ठेवणे, मैला-पाण्याची योग्य विल्हेवाट व स्वच्छता राखणे आवश्यक आहे.या आजारातून मुक्ती मिळविण्यासाठी शासनाने पल्स पोलिओ पासून बालकांची मुक्ती करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे.त्याची नुकतीच अंमलबजावणी करण्यात आली. त्याला कुंभारी येथे महिलांनी लक्षवेधी प्रतिसाद दिला आहे.

शासनाच्या ध्येय धोरणाचे काटेकोर पणे पालन करण्याचा आटोकाट प्रयत्न करुन आरोग्य सेविका डॉ. सोनवणे यु.ए, मणिषा मच्छिंद्र पवार – (आशा )संगिता चंद्रभान शिंदे ‍ ( आशा ) , मदतनीस -ताराताई भानुदास चिने यांच्या सहकार्याने वाडया, वस्त्यांवर जाऊन लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. कुंभारी गावातील महिलांनी सहकार्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close