कोपरगाव तालुका
कुंभारीत तुकाराम बाबा विद्यालयात बालआनंद मेळावा उत्साहात साजरा
संपादक-नानासाहेब जवरे
कुंभारी-(प्रतिनिधी)
आपल्या “तपश्चर्याच्या” साधनेने महादेवाला प्रसन्न करुन भगिरथाने धरतीवर “गंगा” आणली आहे. त्याच प्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाची “ज्ञानगंगा” महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यापर्यंत पोहचवली त्यांचे कार्याचा वारसा पुढे माजी खा. शंकरराव काळे यांनी आपल्या कार्यातून चालू ठेवला असल्याचे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक बी.के गवळी यांनी केले आहे.
सदर कार्यक्रमास शिवाजी कदम , पोपट निळकंठ, श्रीकृष्ण पैठणे, बबन बढे, श्रीराम घुले , तसेच शाळेचे शिक्षक शिंदे ऐस.के, आमले ऐन.टी, दिवे , भोईर , बाविस्कर, वसावे, पावरा , भंडारे तसेच शिक्षिका कातकडे , साळवे, देशमुख , व कर्मचारी दोडके , बनकर , ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास विद्यालय शाळा समितीचे अध्यक्ष रामराव साळुंके यांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी लावलेले स्टॉल पाववडे, बोर , भाजीपाला, पेरू, बिस्किट, चॉकलेट, पाणीपुरी, भेळ, तसेच अन्य पदार्थांच्या स्टॉलचे उदघाटन करण्यात आले.