जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

गोदावरी चाऱ्यांना गेट नसल्याने पाण्याचा मोठा अपव्यय-…या माजी सभापतींचा आरोप

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गोदावरी कालव्यांच्या उपचाऱ्याबाबत गंभीर स्थिती स्थिती असून बऱ्याच उपचाऱ्यांना फाटके नसल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुन काळे यांनी केला आहे.

“गोदावरी जलसंपदाच्या नाशिक विभागाने कालव्यालगत असलेले गरिबांचे अतिक्रमण काढले व मोठ्या धेंडांचे अतिक्रमण तसेच ठेवले आहे.तसेच कोपरगाव तालुक्यातील सात चारीचे देखभाल दुरुस्तीचे काम होत नसल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही” विजय सु.जाधव,शेतकरी,मूर्शतपूर.





नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देण्याबरोबरच जलसाक्षरता वाढीसाठी जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचे’ आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत कोपरगाव येथील तहसील सभागृहात जल पंधरवड्याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी उपस्थिताना पाणी संवर्धन आणि पाणी बचतीची शपथ देण्यात आली तो क्षण.

सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुन काळे,साई संस्थानचे माजी विश्वस्त संभाजी काळे,कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव चव्हाण,माजी अध्यक्ष सुधाकर रोहोम,तहसीलदार महेश सावंत,गौतम सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय आगवण,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके,जलसंपदाचे उपअभियंता संदीप पाटील,बाजार समितीचे संचालक खंडेराव फेफाळे,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,जलसंपदा विभागाने गोदावरी कालव्यांच्या उपचाऱ्याबाबत गंभीर स्थिती असताना त्या चाऱ्यांना फाटके नसल्याचा आरोप केला आहे.बऱ्याच वेळा चाऱ्या आणि शेताची पातळी जुळत नाही त्यामुळे शेतीसिंचनात व्यत्यय येत असल्याचे सांगितले.आवर्तन सोडण्याच्या आधी चाऱ्याची देखभाल सुरू होते ही गंभीर बाब असून त्यामुळे चाऱ्याचे काम पूर्णत्वास जाताना दिसत नाही.परिणामी शेतकऱ्यांचे सिंचनासाठी हाल होताना दिसत आहे.

    सदर प्रसंगी जलसंपदाचे कोपरगाव उपविभागाचे माजी अभियंता श्री सुरळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कालवा सल्लागार समितीच्या बैठका होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होण्यात अडचण येत आहे.खरीप,रब्बी शेतपिकांचे नियोजन सुकर होत असे.मात्र या बैठका रद्द झाल्याने अडचणी वाढल्याचा आरोप केला आहे.परिणामी शेतकऱ्यांत नैराश्य वाढत चालले आहे.गोदावरी कालव्यांची गळती कमी होत नाही.व आगामी काळात भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते असे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

सदर प्रसंगी तहसीलदार महेश सावंत म्हणाले की,”जगात जीवनाची आणि मनुष्यवस्तीची उत्पत्ती नदीकाठी होते.त्याला कारण पाणी असते.आर्थिक पेक्षा पाणी महत्वाचे आहे.पाणी शेती,उद्योग,पिण्याचे पाणी आदीं घटकांना पाण्याची गरज आहे.माझ्या पर्यंत पाणी आले का बाकी शेतकऱ्यांचा विचार होताना दिसत आहे.ही ग्रामीण भागातील शोकांतिका आहे.ही विचारसरणी बदलणे गरजेचे आहे.आज प्रदूषणामुळे गोदावरीचे दूषित पाणी कोणी पिऊ शकत नाही एवढे नदीच्या पाण्यात रसायने वाढली आहे.अंघोळी सोडा आता पाण्यात हात घालावा वाटत नाही हे दुर्दैव आहे.आजच जनतेने सावध होण्याची गरज आहे.नदीचे सरळीकरण खोलीकरण करण्याचा उपक्रम सरकारमार्फत राबविण्यात येत आहे.त्याचा लाभ घ्या असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे.

दरम्यान यावेळी आ.आशुतोष काळे हे दूर संवाद यंत्रणेद्वारे उपस्थितांशी संवाद साधणार होते .मात्र तो संपर्क यंत्रणेच्या अभावी
शक्य झाला नाही त्यामुळे उपस्थितांचा भ्रमनिरास झाला असल्याचे दिसून आले आहे.

सदर प्रसंगी प्रास्ताविक उपविभागीय अभियंता संदीप पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन कारण विधाते यांनी तर उपस्थितांचे आभार शाखा अभियंता भूपेंद्र पवार यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close