जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

प्रेरणा फाऊंडेशन चे वतीने नवीन वर्षाचे स्वागत

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील प्रेरणा फाउंडेशनच्या वतीने नवीन वर्ष विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आहे.यामध्ये महिलांसाठी एक मिनिट , प्रश्न मंजुषा,अंताक्षरी व इतर स्पर्धा घेण्यात आल्या असल्याची माहिती प्रेरणा फाउंडेशन चे अध्यक्ष अॅड.मनोज कडू यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

सदर प्रसंगी प्रेरणा फाउंडेशनच्या उपाध्यक्ष रश्मी कडू ,सदस्य अमृत रोहम , सुवलाल भंडारी , दौलत शिरसाठ , नगरसेविका वायखिंडे ताई , संभाजी नाईक , वसंतराव वाकचौरे सर , विकास कुलकर्णी सर आदी मान्यवर उपस्थित होते.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी व परिसरातील स्त्री पुरुषांचे , लहान , मुलांचा सुप्त गुणांना चालना देण्याचा दृष्टीने प्रेरणा फाउंडेशन द्वारे राबविलेला हा नवोदित असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष अशोक कोठारी यांनी केले.

सदर स्पर्धे मध्ये छाया खेमनर , बाळासाहेब कुळधरण , अर्चना चव्हाण , सुरेखा भंडारी , साक्षी जगदाळे , शकुंतला साखळे , प्रभा तापसे , मंगला राणे , सुवर्णा महानुभाव, प्रेरणा बंब, संजय महानुभाव, उज्वला काळे, कविता निकुंभ आदी स्पर्धक विजयी झाले.कोपरगाव येथील लायन्स पार्क येथे पुरुष व महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्रेया परीख यांनी केले व उपस्थितांचे आभार तिवारी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close