कोपरगाव तालुका
..या क्रिकेटपटूंचे साई दर्शन संपन्न
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया व माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.साईबाबा दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला आहे.

दरम्यान यावेळी उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे,जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.साई दर्शनानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान आज राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनीही साई दर्शन घेऊन समाधान व्यक्त केले आहे.त्यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला,शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने आदी मान्यवर उपस्थित होते.
