कोपरगाव तालुका
सातबारा उतारा संगणकीकरण आणि डिजिटल स्वाक्षरी अभियानात कोपरगांव जिल्ह्यात प्रथम
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांचा सातबारा उतारा संगणकिकरण आणि डिजिटल स्वाक्षरी या विशेष अभियानात कोपरगांव तालुक्यातील एकुण ६३ हजार ९२७ सातबारा संगणकिकरण आणि डिजिटल करण्यात आले असून हा उच्चांक असून तालौक्याने अहमदनगर जिल्ह्यात प्रथम स्थान प्राप्त केले असल्याचे गौरवोद्गार जमाबंदी आयुक्त राज्याचे समन्वयक रामदास जगताप यांनी एका शिबिरात नुकतेच काढले आहे.
कोपरगांव तालुक्यात सातबारा उतारा संगणकिकरण आणि डिजिटल स्वाक्षरी या विशेष अभियानात जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी,उपजिल्हाधिकारी(महसुल) उर्मिला पाटील, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन आणि कोपरगांव महसुल मंडळातील सर्व मंडलाधिकारी, तलाठी यांनी घेतलेली मेहनत यामुळेच अहमदनगर जिल्ह्यात प्रथम स्थान मिळाले आहे-तहसीलदार योगेश चंद्रे
सातबारा संगणकिकरण आणि डिजिटल स्वाक्षरी यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात प्रथम स्थान प्राप्त केल्याबद्दल जमाबंदी आयुक्त राज्याचे समन्वयक रामदास जगताप यांनी कोपरगांवचे तहसिलदार योगेश चंद्रे यांचा सन्मान केला. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी(महसुल) उर्मिला पाटील, महसुल नायब तहसिलदार मनिषा कुलकर्णी, कोपरगांव तलाठी योगेश तांगडे यांचे महसूलचे कर्मचारी उपस्थित होते.
कोपरगांव तालुक्यात सातबारा उतारा संगणकिकरण आणि डिजिटल स्वाक्षरी या विशेष अभियानात जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी,उपजिल्हाधिकारी(महसुल) उर्मिला पाटील, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन आणि कोपरगांव महसुल मंडळातील सर्व मंडलाधिकारी, तलाठी यांनी घेतलेली मेहनत यामुळेच अहमदनगर जिल्ह्यात प्रथम स्थान मिळाले आहे-तहसीलदार योगेश चंद्रे
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सातबारा संगणकिकरण आणि डिजिटल स्वाक्षरी संदर्भात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी उपस्थितांना जमाबंदी आयुक्त राज्याचे समन्वयक रामदास जगताप यांनी मार्गदर्शन केले त्या वेळी ते बोलत होते.शिबिरात महसुलाच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील उपस्थित होत्या.याप्रसंगी कोपरगांव महसुल मंडळाचा विशेष गौरव करत तहसिलदार योगेश चंद्रे यांचा सन्मान केला.याप्रसंगी महसुल नायब तहसिलदार मनिषा कुलकर्णी, कोपरगांव तलाठी योगेश तांगडे यांचे सह अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तहसिलदार,मंडलाधिकारी, तलाठी उपस्थित होते.