जाहिरात-9423439946
महसूल विभाग

“मी,’जेथे बसतो तेथेच सिंहासन निर्माण होते”

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील शेतकरी एकनाथ वामन थोरात यांच्या शेताची अकृषक कारणासाठी कोपरगाव येथील वरिष्ठ महसुली अधिकाऱ्याने अनाधिकाराने पोलीस यंत्रणेचा वापर करून नासधूस केल्याचे प्रकरण उघड झाले असून या प्रकरणी शेतकरी एकनाथ थोरात (वय-८०) यांनी आदेश प्रत मागीतली असता ..त्या वरिष्ठ महसुली अधिकाऱ्याने, “मी,’जेथे बसतो तेथेच सिंहासन निर्माण होते” असे उत्तर दिले असल्याची चर्चा नागरिकांत आहे.या प्रकरणी संबंधित शेतकरी व जवळके ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वसंत कारभारी थोरात यांनी शिर्डी येथील प्रांताधिकारी माणिक आहेर यांचेकडे लेखी तक्रार केली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सदर महसुली अधिकाऱ्याने दि.१३ जुलै २०२३ रोजी जी शिर्डी पोलिसांना घेऊन जी अकृषक कारणासाठी जी बांधाची तोडफोड व झाड-झाडोरा तोडण्याची व अनाधिकृत रस्ता देण्याची जी कारवाई केली त्यावेळी शेतकऱ्याने आदेश मागितला असता त्यास तो नाकारला गेला आहे.त्यावेळी या महाशयांनी दिलेले उत्तर मोठे रंजक आहे.त्यावेळी ते म्हणाले की,”मी,’जेथे बसतो तेथेच सिंहासन निर्माण होते” अशी चर्चा नागरिकांत आहे.त्यासाठी काही संस्था चालकाचे लाभार्थी असलेल्या असामाजिक तत्वांनीं मदत केली असल्याची माहिती सदर शेतकऱ्याने दिली आहे.त्या विरोधात शेतकऱ्याच्या मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”शेतकऱ्याला स्वत:च्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल,तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये नवीन रस्त्यासाठी अर्ज करता येतो.हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो.त्यासाठी विशिष्ट नमुन्यात तहसीलदार तथा महसुली अधिकाऱ्यांकडे तक्रारदाराकडून अर्ज मागवला जातो.त्यासाठी जसा रस्ता हवा त्याचा कच्चा नकाशा तयार करून द्यावा लागतो,याशिवाय जर जमीन कधी मोजली असेल शासनाकडून तर त्याची एक प्रत,चालू वर्षीचा सातबारा,शेजारील शेतकऱ्यांचे नाव पत्ते व जमिनीचा तपशील,जर काही कोर्ट-कचेरी झाली असेल किंवा चालू असेल तर ती माहिती आदी माहिती द्यावी लागते.

तहसीलदारांकडे अर्ज दाखल केल्यानंतर अर्जदार व संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजावली जाते.कोणाचे काही म्हणणे असेल तर ते ऐकूण घेतले जाते.अर्जासोबत दिलेल्या कच्चा नकाशा वरून किती फुटाचा रस्ता देणे आवश्यक याची स्थळ पाहणी मंडलाधिकारी करतात.किंवा तहसीलदार,नायब तहसीलदार आदी स्वतः स्थळ पाहणी करतात व पाहणी करत असताना शेतकऱ्याला खरोखरच नवीन रस्त्याची गरज आहे का याचे निरीक्षण केले जाते.तहसीलदार त्याबाबत खरोखर अर्जदारास नवीन रस्त्याची खरंच गरज आहे का ? यापूर्वीचे लोक कोणत्या रस्त्याने ये जा करत होते ? नवीन रस्ता जर करायची वेळ आली जर जवळचा रस्ता कोणता ? मागणी केलेला रस्ता सरबांधा वरून आहे का ? या रस्त्याला अन्य काही पर्याय आहे का ? जर नवीन रस्ता केला तर इतर शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही ना किंवा कमीत कमीत होईल याची काळजी घेत असतो.आदी सर्व बाबींचा विचार करून जर तालुक्याचे तहसीलदार यांना वाटलं तर ते अर्ज मंजूर करतात किंवा फेटाळतात सुद्धा.(पण हे सर्व सोपस्कार करतात केवळ शेतकऱ्यासाठी वाणिज्यिक अथवा अकृषक संस्थेच्या कारणासाठी नव्हे.)

अर्ज मान्य झाला तर रस्ता लगतच्या शेताच्या हद्दी किंवा बांधावरून देण्याचे आदेश संबंधित अधिकारी देतात.पण शेजारच्या शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेतली जाते.रस्ता दिला जर पायवाट दिली तर ८ फूट रुंद व दोघांच्या संमतीने कमी जास्त रुंदी करता येते.जर अजून मोठा रस्ता हवा असेल तर शेजारच्या शेतकऱ्याकडून विकत घेणे गरजेचे बनते.मात्र हा रस्ता बांधावरूनच देता येतो.किती रुंदीचा रस्ता असावा असा उल्लेख १८८२ च्या कलम १४ या कलमाखाली केलेला नाही त्यामुळे बांधाच्या एकाबाजूने एक चाकोरी व दुसऱ्याबाजूने एक चाकोरी असा उल्लेख करूनच आदेश पारित होतो.यात या रस्ता वापराचा हक्क असतो जागेचा अधिकार नसतो.यातील कलम ५(१)(ब) शेत रस्त्यावरील अडथळा काढता येतो पण शेत बांधावरून नवीन रस्ता देता येत नाही हे विशेष ! पण हे सर्व कृषक कारणासाठी करता येते.मात्र येथे महसुली अधिकाऱ्याची तऱ्हाच न्यारी ! सदर रस्ता नकाशावर नाही.त्यावर वर्दळ असली तरी त्या अपिलीय शेतकऱ्याने त्यास येणाऱ्या-जाणाऱ्यास व त्यांच्या वाहनास कधी हरकत घेतलेली नाही.

त्यांनी या प्रकरणी सुनावणी पूर्ण झालेली नसताना व शेतकऱ्याने कधीही रस्ता अडवणूक केली नसताना व त्याची कोठेही लेखी नोंद नसताना हे उद्योग अकृषक कारणासाठी केले आहे.त्या विरोधात प्रांताधिकारी यांचे कडे सुनावणी प्रलंबित आहे.असे असताना त्यांनी कोपरगाव येथील गोदावरी काठी छोटया पुलाजवळ असलेल्या काँग्रेस नेत्याच्या खाजगी संस्थेच्या जवळके परिसरातील शाखेसाठी हा नसता उद्योग करण्यात आला असल्याची माहिती हाती आली आहे.त्याला मदत केली ती भाजपस्थित महसुली नेत्याने हे विशेष ! त्यासाठी कोल्हार येथील आपल्या नातेवाईकांचा वापर करण्यात आला असून कोल्हार मार्गे महसूल मंत्र्यांच्या पदाचा अनाधिकाराने त्यासाठी वापर करण्यात आला असल्याची विश्वसनीय पण धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्या साठी या महसुली अधिकाऱ्याने आपल्या पदाचा दुरूपयोग केला असल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे.त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शेतकरी एकनाथ थोरात व माजी सरपंच वसंत थोरात यांनी दाद मागितली आहे.त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

संबंधित वयोवृद्ध शेतकऱ्यांची दोन्ही मुले ही बाहेरगावी असतात.विशेष म्हणजे या कारवाईसाठी शिर्डी पोलिसांनी कुठलाही निवाडा किंवा महसुली आदेश नसताना पोलिसी बळ कसे पुरवले ही विशेष बाब मानली जात आहे.

दरम्यान सदर महसुली अधिकाऱ्याने दि.१३ जुलै २०२३ रोजी जी शिर्डी पोलिसांना घेऊन जी अकृषक कारणासाठी जी बांधाची तोडफोड व झाड-झाडोरा तोडण्याची व अनाधिकृत रस्ता देण्याची जी कारवाई केली त्यावेळी शेतकऱ्याने आदेश मागितला असता त्यास तो नैसर्गिक न्याय नाकारला गेला आहे.त्यावेळी या महाशयांनी दिलेले उत्तर मोठे रंजक आहे.त्यावेळी तो म्हणाला की,”मी,’जेथे बसतो तेथेच सिंहासन निर्माण होते” अशी चर्चा नागरिकांत आहे.त्यासाठी काही संस्था चालकाचे लाभार्थी असलेल्या असामाजिक तत्वांनीं मदत केली असल्याची माहिती सदर शेतकऱ्याने दिली आहे.त्यावेळी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील एका वाक्याची आठवण झाल्या शिवाय राहत नाही.”मै जहाँ खडा होता हुं,वहासे लाईन सुरू होती है’त्यामुळे या कहाणीची कोपरगाव तालुक्यात सर्वत्र चवीने चर्चा सुरु आहे.त्या विरोधात वयोवृद्ध शेतकऱ्याचा मुलगा बजरंग एकनाथ थोरात यांनी शिर्डी येथील वरिष्ठ महसुली अधिकाऱ्यांकडे दाद मागीतली आहे.ते आता काय भूमिका घेणार याकडे कोपरगाव तालुक्याचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close