जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे कोपरगावात उमटले पडसाद

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे पडसाद कोपरगाव शहरातही उमटले असून या विधेयकाच्या विरुद्ध जमियात उलमाए हिंद आणि मुस्लिम समाज आणि इतर संघटनांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर जमून नागरिकांनी कोपरगाव तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर त्याला राज्यसभेतही मंजुरी मिळाली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले. संसदेच्या दोन्ही सभागृहात केंद्र सरकारनं मंजूर करून घेतलेल्या सुधारीत नागरिकत्व कायद्याला मात्र देशभरातून विरोध होत आहे.कोपरगावात त्याचे पडसाद उमटले आहेत.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर त्याला राज्यसभेतही मंजुरी मिळाली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले. संसदेच्या दोन्ही सभागृहात केंद्र सरकारनं मंजूर करून घेतलेल्या सुधारीत नागरिकत्व कायद्याला मात्र देशभरातून विरोध होत आहे. देशाच्या अनेक राज्यांत निदर्शनं, मोर्चे आणि आंदोलनं झाली. काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण लागले.

कोपरगाव तालुक्यातही त्याचे पडसाद उमटले आहेत.कोपरगाव शहरात निघालेल्या मोर्चात मुस्लिम समाजसह काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी झाले होते तर अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यानी सहभाग घेत सरकारचा निषेध केलाय.यावेळी जमियात उलमाए हिंद आणि मुस्लिम समाज आणि इतर संघटनांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. कोपरगाव शहरात सरकारचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले.शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदाना पासून निघालेला हा मोर्चा तहसिल कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मोठा जनसमूह मोर्चात सहभागी झाला होता.तहसील कार्यालया जवळ मोर्चा आल्यानंतर तेथे सभेत रूपांतर झाले होते. यावेळी सरकारच्या निषेधाचे फलक घेत मोर्चा कार्यालयावर घोषणा देत पोहचला.मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांनी हातात फलक घेतले होते. कोपरगाव शहरात निघालेल्या मोर्चात मुस्लिम समाजसह काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी झाले होते तर अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यानी सहभाग घेत सरकारचा निषेध केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close