जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

उक्कडगाव नजीक एकाची रस्तालूट,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस साधारण अठरा कि.मी.अंतरावर असलेल्या उक्कडगाव ग्रामपंचायत हद्दीत मालकाने दिलेले पैसे घेऊन भोजडे येथून नांदगाव ता.वैजापूर येथे जात असताना बजाज प्लसर वरून आलेल्या व आपले तोंड बांधलेल्या अज्ञात तीन चोरट्यानी आपली गाडी आडवी घालून आपल्या कडील रोख पाच हजरांची रक्कम व एक चार हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी,वीस हजार रुपये किमतीची हिरो डिलक्स दुचाकी असा 29 हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला असल्याची फिर्याद भोजडे येथील फिर्यादी व मजूर लखन नवनाथ आहेर (वय-17) याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.या घटनेने उक्कडगाव,शिरसगाव,तीळवणी परिसरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी लखन आहेर हा तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेत असून तो भोजडे येथील रहिवासी आहे.तो वेळ मिळेल तेंव्हा त्याच गावातील देविदास बाबुराव खोडके यांचेकडे मजुरीने काम करतो.मालकाचे मामा नांदगाव येथील असून त्याना पैशाची गरज पडल्याने त्यांनी आपल्या भाच्याला फोन करून पाच हजाराची रक्कम बोलावली असता त्यांनी या मजुरा मार्फत ती दुचाकीवरून पाठवली असता हि दुर्दवी घटना गुरुवारी दि.21 नोव्हेम्बर रोजी सायंकाळी सात वाजेच्या गडद पडल्यावर अंधाराचा फायदा घेऊन घडली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी लखन आहेर हा तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेत असून तो भोजडे येथील रहिवासी आहे.तो वेळ मिळेल तेंव्हा त्याच गावातील देविदास बाबुराव खोडके यांचेकडे मजुरीने काम करतो.मालकाचे मामा नांदगाव येथील असून त्याना पैशाची गरज पडल्याने त्यांनी आपल्या भाच्याला फोन करून पाच हजाराची रक्कम बोलावली असता त्यांनी या मजुरा मार्फत ती दुचाकीवरून पाठवली असता हि दुर्दवी घटना गुरुवारी दि.21 नोव्हेम्बर रोजी सायंकाळी सात वाजेच्या गडद पडल्यावर अंधाराचा फायदा घेऊन घडली आहे.फिर्यादी लखन आहेर यास अडविल्यावर त्यांच्या दुचाकीची एका चोरट्याने चावी काढून घेतली.तर दुसऱ्याने गाडी उभी करून नंतर दोघांनी त्याला उक्कडगाव येथील स्मशान भूमीच्या खोलगट भागात लोटत नेऊन अंगाची झाडाझडती घेऊन खिशातील रोख पाच हजाराची रक्कम खिशातील भ्रमणध्वनी काढून घेऊन गाडी घेऊन पोबारा केला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी गु.र.नं.160/2019 भा.द.वि.कलम.392,341,34 प्रमाणे अज्ञात तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close