कोपरगाव तालुका
दुचाकीस मारुतीची धडक दोन जखमी,कोपरगावात गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव शहरातून जाणाऱ्या नगर-मनमाड राज्यमार्गावरून येवल्याकडे जाणाऱ्या दुचाकीस नुकतीच मारुती व्हॅनने (क्रं. एम.एच.15 एफ.टी.5187 )हिने जोराची धडक दिल्याने फिर्यादी शिवराम नवलसिंग बडोले (वय-28 ) रा. खरगोन मध्यप्रदेश हल्ली रा.पावबाके वस्ती संगमनेर हे व त्यांची पत्नी व मुलांसह जखमी झाल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.घटने नंतर मारुती व्हॅन चालक आरोपी फरार झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,फिर्यादी शिवराम बडोले हे आपल्या मालकीच्या हिरो डिलक्स या दुचाकीने खरगोन,मध्यपदेशकडे आपल्या पत्नी व मुलांसह जात असताना येवला नाका कोपरगाव येथे येवल्याकडून शिर्डीकडे भरधाव जाणाऱ्या वरील क्रमांकाच्या मारुती व्हॅन ने त्याना रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता धडक दिली व तो कुठलीही मदत न देता फरार झाला आहे.यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.387/2019 भा.द.वि.कलम 279,337.338.427,मो.वा. का.कलम.184,134,(अ),( ब),177 प्रमाणे फरार आरोपी चालका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहे.