जाहिरात-9423439946
दळणवळण

सावळीविहिर-सेंधवा मार्ग राष्ट्रीय महामार्गात वर्ग,आता कामाला येणार वेग

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातून जात असलेला व नव्याने घोषित झालेला सावळीविहीर ते सेंधवा (म.प्र.) या मार्गाला एन.एच.७५२ जी हा क्रमांक देण्यात आला आहे मात्र हा राष्ट्रीय महामार्ग एन.एच.ए.आय.कडे हस्तांतरीत न झाल्यामुळे सदर महामार्गाचे काम करण्यास अडचणी येत होत्या.महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने कोपरगाव-सावळीविहीर महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले असल्याने आता या माहामार्गाच्या कामाला वेग येणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

या मार्गाचे दुरुस्तीचे काम तातडीने सुरू होऊन उच्च दर्जाचे काम व्हावे यासाठी हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे लवकरात लवकर हस्तांतरीत करण्यासाठी आ.काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टींने अत्यंत महत्वाचा दक्षिण-उत्तर असलेला व काही महिन्यांपूर्वी घोषित करण्यात आलेल्या सावळीविहीर ते सेंधवा (राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी) या मार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. या मार्गावरून नियमितपणे एक लाख मेट्रिक टन वजनाच्या जवळपास दहा हजार वाहनांची दैनिक वर्दळ असते.कोपरगाव तालुक्याच्या शेजारीच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिर्डी देवस्थान असल्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या राज्यातील व परराज्यातील साईभक्तांना या खराब रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसात या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली असून अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या मार्गाचे दुरुस्तीचे काम तातडीने सुरू होऊन उच्च दर्जाचे काम व्हावे यासाठी हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे लवकरात लवकर हस्तांतरीत करण्यासाठी आ.काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.सदर पाठपुराव्याचा भाग म्हणून सोमवार (दि.१९) रोजी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने कोपरगाव-सावळीविहीर महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहे. सदर ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित होऊन त्याचे काम होण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला असून त्याबद्दलचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी राजेंद्र बिडवई यांनी नुकतेच आ.काळे यांना सुपूर्द केले आहे.या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) उल्हास देबडवार,अपर मुख्य सचिव मनोज सौनिक,उपसचिव श्रीमती प्रज्ञा वाळके व अहमदनगर विभागाचे अधिक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close