Uncategorized
पार्थ पवारांनी शिर्डीत घेतले साई समाधीचे दर्शन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी नुकतेच शिर्डी येथे येऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक यांनी त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे सर्व संचालक मंडळ, गौतम सहकारी बँकेचे अध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तसेच कोपरगाव, राहाता तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी साईबाबा संस्थांनच्या वतीने मंदिर प्रमुख रमेश चौधरी यांनी पार्थ पवार यांचा सत्कार केला.