जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावचा विकास राबविणे हे आपली जबाबदारी-आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
माजी खा. शंकरराव काळे यांनी सर्वसामान्य जनतेचा विचार केला तो वारसा पुढे चालवत असून जनतेने सेवा करण्याच्या दिलेल्या संधीतून तो या पुढेही पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी टाकळी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे ४८ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या बाळासाहेब देवकर घर ते अनिल चव्हाण घर रस्ता,पद्माकांत कुदळे घर ते बापूसाहेब बोरावके घर रस्ता, प्रभाकर बोरावके विहीर ते राजेंद्र अंबर घर रस्ता व दत्तमंदिर ते छबुराव आव्हाड घर रस्त्यांच्या डांबरीकरण व मजबुतीकरण कामाचे दत्तमंदिर परिसर येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे भूमीपूजन तसेच संवत्सर येथे येथे २४ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या बबनराव बारहाते वस्ती ते कोद्रे वस्ती रस्ता व पोपट गायके वस्ती ते अरुण जगताप वस्ती रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमीपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे, कारभारी आगवन,छबुराव आव्हाड,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक पद्माकांत कुदळे,विठ्ठलराव आसने,बाळासाहेब बारहाते,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,श्रावण आसने, बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले,माजी नगरसेवक दिनार कुदळे,छगणराव देवकर,दिलीपराव गायकवाड,लक्ष्मण देवकर,डॉ.चंद्रशेखर आव्हाड,सुरेश देवकर,अनिल चव्हाण,किसनराव आहेर,शशिकांत देवकर, दिलीपराव बोरनारे,चांगदेव आगवन,अॅड. शिरीष लोहकणे,अॅड. आर.टी. भवर,बाळासाहेब देवकर, किसनराव देवकर,भाऊसाहेब देवकर,गणेश देवकर, शिवाजीराव देवकर,धनंजय देवकर,दत्तात्रय देवकर, सुनील कुहिले,नारायण कुमावत,उपअभियंता प्रशांत वाकचौरे, पंचायत समिती शाखा अभियंता लाटे, दहिफळे, ग्रामसेवक विजय पाटील आदींसह टाकळी ग्रामस्थ उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”मागील पाच वर्षात अनेक गावांना सापत्नपणाची वागणूक दिली गेली. मी मात्र संपूर्ण मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वच गावातील नागरिकांपर्यंत विकास कसा पोहोचेल यासाठी माझे प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या शेजारील जरी गाव असले तरी त्या गावातील नागरिकांना अपेक्षित असलेली विकासकामे करणार आहे. मतदार संघातील अनेक गावांचा रस्ते, पाणी, विजेचे प्रश्न देखील प्रलंबित आहेत याची मला जाणीव असून जनतेने निर्धास्त राहावे. कोरोनाच्या संकटात देखील आपण निधी मिळविला आहे त्यामुळे पुढील काळात मतदार संघाच्या विकासासाठी अजून निधी आणून निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करू असे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close