जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात …या माजी खासदारांचा पुतळा बसवणार!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
शेती,सहकार,शिक्षण क्षेत्रात अजोड योगदान देणाऱ्या व पाणी प्रश्नासाठी स्वत:ला वाहून घेणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे यांचा पुतळा पंचायत समितीच्या प्रांगणात उभारला जावा अशी मागणी कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाकडून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना देण्यात आले आहे.त्यास कोपरगाव पंचायत समिती अर्थातच अनुकूल असल्याचे वृत्त आहे.

पोहेगाव येथील स्व.गणपतराव औताडे संस्थापक असलेल्या कोपरगाव सहकारी कारखान्याचे सलग नेतृत्व केले होते.आता त्यांचे समर्थक त्यांच्या नावाने स्थापन केलेल्या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष असलेल्या कारभारी आगवान यांनीच केलेली मागणी ही आ.काळेंचीच मागणी मानली पाहिजे.कारण आगवन यांचे त्यांच्या शिवाय पानही हालत नाही हे सर्व तालुक्याला ज्ञात आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”गणपतराव औताडे आणि माजी आ.के.बी.रोहमारे या दोन्ही परिवारांनी कोळपेवाडी आणि संजीवनी या दोन सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली त्यां संस्था अनुक्रमे माजी.खा.शंकरराव काळे व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी पुढे ताब्यात घेतले आणि सत्ता संघर्षाला सुरवात झाली.त्या वेळेपासून कोपरगाव तालुक्यातील विविध संस्थांवर आपलं वर्चस्व राहावं यासाठी नेहमीच दोन्ही कुटुंबांनी प्रयत्न केले.माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणि माजी खासदार शंकरराव काळे या दोन नेत्यांच्या भोवतीच तालुक्याचं राजकारण सतत फिरत राहिलं. शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पक्ष स्थापनेपासून ते शरद पवारांसोबत होते.३५ वर्ष आमदार राहिलेल्या शंकरराव कोल्हेंना तीनदा मंत्रीपद मिळाले.२००४ साली शंकरराव कोल्हे यांनी पुत्र बिपीन कोल्हे यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी असल्याने शंकरराव काळे यांचे पुत्र अशोक काळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेकडून निवडणूक लढवली.सहकारात या नेत्यांची गत तीन पिढ्या मांड ठोकली आहे.आता त्यांची तिसरी पिढी कार्यरत झाली आहे.शंकरराव काळे यांनी दोनदा जिल्हा परिषद अध्यक्षपद व पारनेर विधानसभेचे तर १९९१ साली एकदा कोपरगाव लोकसभेचे दिल्ली संसदेत नेतृत्व केले होते.त्यांनी शिक्षण राज्यमंत्री पद शरद पवार पुलोद सरकारचे मुख्यमंत्री असताना भूषवले होते.रयत शिक्षण संस्थेचे ते पंधरा वर्षे अध्यक्ष होते.या काळात पारनेरला त्यांनी झुकते माप दिले होते.तर पोहेगाव स्व.गणपतराव औताडे संस्थापक असलेल्या कोपरगाव सहकारी कारखान्याचे सलग नेतृत्व केले होते.आता त्यांचे समर्थक कारभारी आगवान यांनीच केलेली मागणी ही आ.काळेंचीच मागणी मानली पाहिजे.कारण आगवन यांचे त्यांच्या शिवाय पानही हालत नाही हे सर्व तालुक्याला ज्ञात आहे.

त्यामुळे या मागणीला पंचायत समिती प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्यास नवल ते काय?परिणामस्वरूप कोपरगाव पंचायत समितीच्या प्रांगणात कर्मवीर शंकररावजी काळे यांचा पुतळा उभारण्यास परवानगी दिल्यात जमा आहे.कारण त्या ठिकाणी सेना व भाजप विरोधक केवळ नावाला आहे त्यांचे अस्तित्व नावालाही दिसले नाही ही वस्तुस्थिती आहे.त्यांना विरोध होण्याची सुतराम शक्यता नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close