जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

डाऊच खुर्द येथे एकास मारहाण,कोपरगावात पाच जणांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील पान मळा येथिल रहिवाशी असलेल्या कमल भिवराज खरात (वय-60 वर्ष) यांना मागील भांडणाच्या कारणावरून त्याच गावातील आरोपी उमा रंभा खरात,बाळू उमा खरात,विजाबाई उमा खरात, सुभाष भास्कर खरात,माणिक भास्कर खरात,यांनी आपले घराचे समोर येऊन शिवीगाळ करून लाथाबुक्य्यांनी मारहाण केल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने डाऊच खुर्द परिसरात खळबळ उडाली आहे.

आपण डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत रहात असून आपल्याला त्याच गावातील वरील नावाचे पाच आरोपी गैरकायद्याची मंडळी जमवून आपल्या घरासमोर येऊन मागील भांडणाच्या कारणावरून आपल्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

या प्रकरणी फिर्यादी महिला कमल खरात यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, आपण डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत रहात असून आपल्याला त्याच गावातील वरील नावाचे पाच आरोपी गैरकायद्याची मंडळी जमवून आपल्या घरासमोर येऊन मागील भांडणाच्या कारणावरून आपल्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यामुळे आपले जीवित धोक्यात आले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.नं.385/2019 कलम 323,504,506,143,147,149 प्रमाणे वरील पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप बोरसे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्री ससाणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close