जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात अवकाळी पावसाने 42.42 कोटींचे शेतकऱ्यांचे नुकसान,आकडेवारी जाहीर

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यात परतीच्या पावसाने गत महिन्यात ठाण मांडून शेती क्षेत्राचे मोठे नुकसान केले असून त्याची 33 टक्क्यांहून अधिक नुकसानभरपाई गृहीत धरून आकडेवारी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आज सायंकाळी सातच्या सुमारास जाहीर केली असून तालुक्यात 40 हजार 0022 शेतकऱ्यांचे 32 हजार 374.17 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यांचे एकूण 42 कोटी 42 लाख 87 हजार 903 रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.

राज्यात परतीच्या पावसाने गेले अनेक दिवस ठाण मांडल्याने मोठा कहर झाला होता.त्यात सोयाबीन,मका.बाजरी,कापूस,व तत्सम खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते.त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन त्यांनी राज्य सरकारकडे नुकसानीची मागणी केली होती.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नव्हता.कोपरगाव तालुक्यातही खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

राज्यात परतीच्या पावसाने गेले अनेक दिवस ठाण मांडल्याने मोठा कहर झाला होता.त्यात सोयाबीन,मका.बाजरी,कापूस,व तत्सम खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते.त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन त्यांनी राज्य सरकारकडे नुकसानीची मागणी केली होती.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नव्हता.कोपरगाव तालुक्यातही खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते.त्यामुळे या पिकांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना व राजकीय पक्षांनीही केली होती.त्यामुळे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.हे पंचनामे करताना अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांना काढण्यास प्रारंभ केला होता.त्यामुळे खळ्यावरील पिकांबाबत पंचनामे करण्यास महसूल अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने मोठा कोलाहल माजला होता.मात्र त्या नंतर काही पंचनामे करण्यात आले होते.मात्र काही तसेच राहून गेले होते.या पावसाने सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे झाले होते.त्यामुळे तालुक्यातील 79 गावात नेमके शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले याकडे नागरिक व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.हि आकडेवारी आता जाहीर झाली असून.यात प्रशासनाने विमा काढलेले व विमा न काढलेले असे क्षेत्र अशी वर्ग वारी केली आहे.या खेरीज फळपिकांची वेगळी नोंद केली आहे.ती पुढील प्रमाणे-

कोपरगाव तालुक्यातील 79 गावातील जिरायती भागातील 4 हजार 365 शेतकऱ्यांचे 2 हजार 948.01क्षेत्र 33 टक्क्यांपेक्षा बाधित झाले असून त्यांचे प्रति हेक्टरी 6 हजार 800 प्रमाणे 2 कोटी 46 लाखांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.या पैकी 347 शेकऱ्यांनी विमा काढलेला होता तर 4018 शेतकऱ्यांनी विमा काढलेला नव्हता.या खेरीज बागायती क्षेत्रातील 33 हजारे 659 शेतकरी बाधित झाले असून त्यातील 4 हजार 113 शेतकऱ्यांनी विमा काढलेला होता.त्याचें एकूण नुकसान 37 कोटी 62 लाख 88 हजार 335 रुपयांचे नुकसान झाले आहे.यात शेतकऱ्यांना 13 हजार 500 रुपयांचे नुकसान प्रति हेक्टरी गृहीत धरले आहे.तर फळपिकाखालील 1998 शेतकरी असून त्यांचे बाधित क्षेत्र 1552.95 हेक्टर इतके आहे.त्यांना सरकारने पंचनामा करताना प्रति हेक्टरी 18 हजाराचे नुकसान गृहीत धरले आहे.ते 2 कोटी 79 लाख 531 रुपये नोंदले गेले आहे.त्यातील 248 शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे.आता सरकार या बाधित शेतकऱ्यांना कधी नुकसान भरपाई देणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close