जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

मुख्यमंत्री ठाकरे यांनी राबवलेली कर्जमाफी हि प्रामाणिक-कोपरगावात मंत्र्यांचे समर्थन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होताच त्यांनी सर्व प्रथम शेतकरी हिताचा निर्णय घेतला व चोवीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली.वास्तविक या पूर्वी सर्व कर्जमाफ्या या खूप कागदाच्या भेंडोळ्यातून व्हायची पण ठाकरे यांनी हि कर्ज माफी शांतचित्ताने स्वतःच्या अधिकारात जाहीर केली आहे.या पूर्वीच्या कर्जमाफ्या या निवडणुकीच्या तोंडावर किंवा शेतकऱ्यांचा दबावातून झाल्या व बऱ्याच वेळा खोटे आकडेवारी फेकून शेतकऱ्यांना फसविण्यात आले मात्र मुख्यमंत्र्यांनी मात्र हि कर्जमाफी योजना प्रामाणिकपणे राज्यात राबवली असल्याचे प्रतिपादन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली आहे.

“कोपरगावात गौतम पब्लिक स्कूल मध्ये बालपणाचे पहिली पाच वर्ष शिक्षण घेतल्याचा अनुभव सांगून राजकारणाचे बाळकडू त्यावेळी राज्यात कोपरगावच्या राजकारणाची चर्चा व्हायची.त्यावेळी आपण महिन्यातून एकदा पायी कोपरगावात येत असल्याची आठवण सांगूनत्यावेळी कोपरगावातून खूप काही शिकायला मिळाले त्यामुळेच आपण आज जे काही आहे त्यात कोपरगावकरांचा वाटा आहे.या पुढील काळातही आपण कोपरगावातून शिकण्यास इच्छुक आहे”-शंकरराव गडाख,जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य.

शिवसेनेने पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे.युती आघाडीची चिंता न करता कामाला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांना नुकतेच दिले आहे.शिवसेना जनसंपर्क वाढवण्यासाठी शिव संपर्क अभियान सुरु करत असून त्याचा प्रारंभ कोपरगाव शहरातून आज झाला असून त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी खा.सदाशिव लोखंडे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे,उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे,तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे,शहरप्रमुख कलविंदर दडियाल,माजी जिल्हा उपप्रमुख बाळासाहेब जाधव,शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुहास वहाडणे,माजी तालुका प्रमुख श्रीरंग चांदगुडे,माजी शहरप्रमुख भरत मोरे,अस्लम शेख,नगरसेविका सपना मोरे,सौ.वाकचौरे,युवासेना,वाहतूक सेना जिल्हा प्रमुख इरफान शेख,उपतालुका प्रमुख रंगनाथ गव्हाणे,ग्राहक संरक्षण कक्ष,शेतकरी सेनेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी ते पुढे म्हणाले की,”राज्यात सरकार बनविण्यास उद्धव ठाकरे यांनी प्रतिकूल काळ असल्याने नकार दिला होता गत काळातील मित्र पक्षाचा अनुभव वाईट होता,त्याचा त्रास त्यांना व तुम्हा आम्हाला सर्वांना झाला होता.सर्वांनी एकमताने राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा होऊ शकतात असे एकमुखाने सांगितल्याने त्यांचा नाईलाज झाला व राज्यातील परिस्थिती नाजूक असल्याने व सर्वांनी गळ घातल्याने त्यांना नाईलाजाने मुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले.आता त्यांनी पक्ष वःडीचा निर्णय घेतला आहे आता त्यासाठी आपणा सर्वांनी साथ द्यायला हवी व नगर जिल्ह्यातून सर्वाधिक नोंद व्हायला हवी अशी अपॆक्षा व्यक्त केली आहे.

त्यावेळी त्यांनी कोपरगावात गौतम पब्लिक स्कूल मध्ये बालपणाचे पाच वर्ष शिक्षण घेतल्याचा अनुभव सांगून राजकारणाचे बाळकडू त्यावेळी राज्यात कोपरगावच्या राजकारणाची चर्चा व्हायची.त्यावेळी आपण महिन्यातून एकदा पायी कोपरगावात यायचो.त्यावेळी कोपरगावातून खूप काही शिकायला मिळाले त्यामुळेच आपण आज जे काही आहे त्यात कोपरगावकरांचा वाटा आहे.या पुढील काळातही आपण कोपरगावातून शिकण्यास इच्छुक असल्याचे सांगून कोपरगाव तालुक्यतील शिवसेना पदाधिकारी अनुभवी व धाडसी आहे.त्याच्या कामाची चर्चा सर्वत्र आहे.त्यांनी शेवटी सांगितले आहे.

सदर प्रसंगी खा.सदाशिव लोखंडे यांनी बोलताना,”राज्याचे उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात यशस्वी काम केले आहे.आता पक्ष वाढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांसाठी जलसंधारण मंत्री शंकरराव चव्हाण यांनी भूमिका घेतली आहे.कोपरगाव तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.आगामी काळात जुने नवे वाद न करता या जनसंपर्क अभियानातून शिवसेना वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

सदर कार्यक्रमास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कमी उपस्थिती डोळ्यात भरणारी होती.तालुक्यात जिल्हाप्रमुख पद,व मंत्री,खासदार उपस्थित असताना हि उपस्थिती अनेकांना खटकणारी ठरली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केले तर उपस्थितांना उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे,शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख सुहास वहाडणे,शहर प्रमुख कलविंदर दडियाल आदींनी मार्गदर्शन केले आहे.तर उपस्थितांचे आभार अस्लम शेख यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close