आरोग्य
कोपरगावात कोरोना रुग्णसंख्या मूळपदावर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनीधी)
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १२ हजार ६८५ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १३४ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २०६ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६२ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ०८ हजार ०२५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०४ लाख ३२ हजार १०० इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ११.७४ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १२ हजार ३४५ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.३२ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ७३ हजार ४५९ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०३ हजार ५०२ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ६४ हजार ४१० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०५ हजार ५४६ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे. कोरोनाचा वर्तमानात डेल्टा प्लस हा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत असून त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला असून पुन्हा एकदा निर्बंध व शनिवार रविवार बंद ठेवला आहे.व अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी सात ते दुपारी चार पर्यंतच आपली दुकाने सुरु ठेवता येत आहे.डेल्टा प्लसने उचल खाल्ली असून राज्य शासन हादरले आहे.कोरोना रुग्ण काही अंशी पुन्हा वाढु लागले आहे.त्यामुळे काळजी घेणे गरजेचे बनले आहे.तर काही भागात तरुण आपले वाढदिवस भर रस्त्यात करून कोरोना साथीला निमंत्रण देताना दिसत आहे.तर राजकीय नेत्यांनी कथनी करणीला अंतर देत सभा समारंभ सुरु केल्याने चिंता वाढली असून त्यातून रुग्ण वाढण्यास प्रारंभ झाला आहे.त्यातच शहर पोलिसांनी आता कडक धोरण अवलंबले असून विना मुखपट्या फिरणारे व निर्धारित वेळेपेक्षा जास्त दुकाने उघडे ठेवणारांना दंड करण्यास सुरुवात केली आहे.