जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

“बूनलाईंज मोबाईल ॲप”च्या माध्यमातून कोविड संकटात नागरिकांत जनजागृती-माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

विविध जैविक साथींचे आक्रमण आता भारतीयांसाठी परिचयाचे झाले असून या साथीत आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी बूनलाईंज (Boonlinez) मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होऊन नागरिकांना योग्य माहिती मिळणार असून बूनलाईज कंपनीचे सीईओ महेश थोरात यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रासाठी तयार करण्यात आलेल्या बूनलाईंज (Boonlinez) कोपरगाव या मोबाईल अॅपचे व ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी मेमरी फोटो काँटेस्ट’ चे उदघाटन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

“मोबाइल व्यवसाव्यात खूप मोठी स्पर्धा आहे आणि क्षणोक्षणी याच्या सॉफ्टवेअर मध्ये या स्पर्धत बदल घडत आहेत.कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात असे अँप विकास पावणे हि मोठी बाब मानली पाहिजे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा.

ॲंपचा विकास मोबाइल उपकरणाच्या गरजेपोटी फार महत्त्वाचा आहे.मोबाइलचे दिसणे,जलदगती,गरजेची हवी ती माहिती या बाबींचा ॲंप विकास करते आहे.मोबाइल उपकरणे बॅटरीवर चालतात त्यामुळे ते वैयक्तिक संगणकापेक्षा कमी शक्तिमान आहे.शिवाय त्यात स्थळं शोध,चित्रीकरण करणारा कॅमेरा, संगीत,बातम्या,देश विदेशातील चालू घडामोडी अशा विविध बांबी अंतर्भूत आहेत.याच्या विकासाच्या बांबींचा विचार करताना विकासकाने त्याचे स्क्रीन सजावट,आकार,हार्डवेअर तपशील आणि त्याच्या बाह्य आकाराचा विचार करणे आवश्यक आहे कारण मोबाइल व्यवसाव्यात खूप मोठी स्पर्धा आहे आणि क्षणोक्षणी याच्या सॉफ्टवेअर मध्ये या स्पर्धत बदल घडत आहेत.कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात असे अँप विकास पावणे हि मोठी बाब मानली पाहिजे.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, बूनलाईंज कोपरगाव अॅप तयार करतांना कोपरगाव तालुक्यातील महसूल,पोलीस प्रशासन,आरोग्य विभाग व विविध शासकीय कार्यालयांकडून मिळणाऱ्या सोयीसुविधांची माहिती त्या-त्या कार्यालयाकडून समाविष्ट करण्यात आलेली असून आपत्कालीन काळात नागरिकाना वेळेत मदत उपलब्ध व्हावी यासाठी महत्वपूर्ण माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.त्यामुळे नागरिकांना अचूक महिती मिळून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होणार नाही. तसेच सामाजिक बांधिलकी जोपासतांना महेश थोरात यांनी ऑनलाईन खरेदीपासून नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी व स्थानिक व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलेल्या “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन बूनलाईंज वर करण्यात आले असून नागरिकांना बक्षीस जिंकण्याची विनाशुल्क उपलब्ध करून दिलेली संधी कौतुकास्पद असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close