जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात आता उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी-माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघापासून अहमदनगर जिल्हा रुग्णालय १०० किलोमीटर अंतरावर आहे. त्तर नगर जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय नाही त्यामुळे मतदार संघातील नागरिकांना गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी अहमदनगर येथे जाणे शक्य नसल्यामुळे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय श्रेणी दर्जा द्यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता.या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून कोपरगावसाठी उपजिल्हा रुग्णालयाला महाविकास आघाडी सरकारच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिली असून मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव तालुका का भौगोलीक दृष्ट्या नगर जिल्हापासून सर्वात दूरचा तालुका आहे.त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा मिळवणे मोठ्या जिकरीचे बनले जात होते.त्यासाठी कोपरगाव तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून अनेक वर्षांपासून सुरु होती.त्याला नुकतेच आ.काळे यांना यश आले आहे.

राज्यात आरोग्य सेवा संचालनालयार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा उपकेंद्रे,प्राथमिक आरोग्य केंद्रे,उपविभाग रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये व सामान्य रुग्णालये मार्फत पुरविण्यात येतात.या केंद्रामध्ये आरोग्य सुविधा व उपचार पद्धती नवीन उपचारदवारे देण्यात येतात रुग्णालय यांचे काळानुरूप श्रेंणीवर्धन करून त्यांच्या ईमारती मध्ये आवश्यक बदल करण्यात येतात जेणेकरून रुग्णांना योग्य व त्वरित उपचाराच्या सुविधा प्राप्त होतात. जिल्हा रुग्णालये उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालये येथे रुग्णांना संदर्भ सेवा उपलब्ध करून दिली जाते.रुग्णालयांचे राज्यस्तरावरून नियंत्रण केले जाते.कोपरगाव तालुका का भौगोलीक दृष्ट्या नगर जिल्हापासून सर्वात दूरचा तालुका आहे.त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा मिळवणे मोठ्या जिकरीचे बनले जात होते.त्यासाठी कोपरगाव तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून अनेक वर्षांपासून सुरु होती.त्याला नुकतेच आ.काळे यांना यश आले आहे.

वर्तमानात कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कोपरगाव शहरात असलेले ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय आहे.मतदार संघातील लोकसंख्येचा विचार करता रुग्णास मिळणारी आरोग्य सुविधा लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पडत होती.मतदार संघातील नागरिकांना दुर्धर आजारावर वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी जवळपास १०० किलोमीटर अंतर पार करून जावे लागते. एवढे मोठे अंतर पार करीत असतांना अत्यवस्थ रुग्णांच्या जीविताला मोठा धोका होता.अनेकांना त्याची किंमत चुकवावी लागली होती.त्याबाबत नागरिकांत नाराजी उमटत होती.त्याची दखल त्यांनी घेऊन त्यासाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता.आता राज्याच्या आरोग्य विभागाने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यामुळे ३० बेडचे असलेले ग्रामीण रुग्णालय १०० बेडचे होईल.नागरिकांना चांगल्या प्रकारे आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टर्स कायमस्वरूपी उपलब्ध राहतील.अतिदक्षता विभाग असल्यामुळे अंत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही.सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा कोपरगाव मतदार संघातील नागरिकांना एकाच छताखाली मिळण्यास मदत होणार आहे.आ.काळे यांनी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न मार्गी लावून उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळविल्यामुळे नागरिकांनीं समाधान व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close