जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातून तरुणी बेपत्ता,पोलिसांपुढे तपासाचे आव्हान !

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनीधी )

श्रीरामपूर शहरातील रहिवासी महिला आपल्या मुलीसह विवाहित मुलीला भेटण्यास कोळपेवाडी येथे जाऊन परत येत असताना दोघी कोपरगाव येथील बसस्थानकावर उतरल्या असताना तेथून आपली मुलगी समरिन सलीम मन्सूरी ( वय-19 ) हि अचानक बेपत्ता झाली असल्याची तक्रार बेपत्ता मुलीची आई हमीदा सलीम मन्सूरी (वय-45 ) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने श्रीरामपूर,कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

हमीदा मन्सूरी या श्रीरामपूर येथील नगरपालिकेच्या प्रभाग क्रं. चार मधील पालिका गार्डन शेजारील रहिवासी आहेत.तेथे त्या आपल्या कुटुंबासह राहतात.मात्र त्यांची एक मुलगी हि कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी तेथे दिलेली आहे.त्यांना भेटण्यासाठी त्या आपल्या दुसऱ्या एका मुलीसमवेत तीन दिवसांपूर्वी गेल्या होत्या.दोन दिवस तेथे पाहुणचार घेतल्या नंतर त्या आज दुपारी श्रीरामपूर येथे जाण्यासाठी निघाल्या असताना त्या कोपरगाव बस स्थानकात आल्या असताना मुलगी एका बस मध्ये चढली असताना त्या तिला शोधण्यास गेल्या असताना त्यांना ती मिळून आली नाही.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, हमीदा मन्सूरी या श्रीरामपूर येथील नगरपालिकेच्या प्रभाग क्रं. चार मधील पालिका गार्डन शेजारील रहिवासी आहेत.तेथे त्या आपल्या कुटुंबासह राहतात.मात्र त्यांची एक मुलगी हि कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी तेथे दिलेली आहे.त्यांना भेटण्यासाठी त्या आपल्या दुसऱ्या एका मुलीसमवेत तीन दिवसांपूर्वी गेल्या होत्या.दोन दिवस तेथे पाहुणचार घेतल्या नंतर त्या आज दुपारी श्रीरामपूर येथे जाण्यासाठी निघाल्या असताना त्या कोपरगाव बस स्थानकात आल्या असताना मुलगी एका बस मध्ये चढली असताना त्या तिला शोधण्यास गेल्या असताना त्यांना ती मिळून आली नाही.मात्र त्या तशाच पुढे श्रीरामपूर येथे गेल्या व तेथे गेल्यावर त्यांनी हि बाब आपल्या घरच्या माणसांना सांगितली.त्या नंतर त्यांनी पुन्हा कोपरगावात धाव घेऊन त्या बाबत रीतसर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या बाबत शहर पोलीस उशिरा पर्यंत तक्रार दाखल करत होते.दरम्यान या बाबत सदर मुलगी हि बेपत्ता झालीच कशी व ती सज्ञान असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close