जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नजीक अपघात महिला जागीच ठार, दुचाकीस्वार जखमी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथील रहिवासी शेतकरी मच्छीन्द्र गोवर्धन रहाणे (वय-40)हे आपल्या पत्नी समवेत गॅसचे सिलेंडर आणण्यासाठी कोपरगाव कडे जात असतांना मागावून येणाऱ्या अशोक लेलंड कंपनीच्या कंटेनरने (क्रं. एम.एच.16 सी.सी.6433 ) दिलेल्या जोरदार धडकेत त्यांच्या मागे बसलेली त्यांची पत्नी संगीता रहाणे (वय-35 ) या जागीच ठार झाल्या आहेत.तर दुचाकीस्वार रहाणे यांना उपचारार्थ कोपरगाव शहरातील खाजगी रुग्णालयात भरती केले आहे.मात्र त्याना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना शिर्डी येथील साई संस्थान रुग्णालायत हलविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दिपावलीचा सण असल्याने बहादरपूर येथील मच्छीन्द्र रहाणे यांच्या गॅस सिलेंडर मधील गॅस संपल्याने हि जोडी गॅस भरण्यासाठी कोपरगाव येथे दुपारी दीडच्या सुमारास निघाली होती.त्यांनी पुणतांबा फाटा ओलांडल्यावर ते देवी मंदिराजवळून जात असताना मागील बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने त्यांना मागील बाजूने जोराची धडक दिली त्यात त्यांची पत्नी संगीता राहणे या जागीच ठार झाल्या आहेत.तर अपघात झाल्या नंतर नजीकच्या ग्रामस्थांनी त्याना तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याना शहरातील खाजगी रुग्णालयात भरती केले आहे.तथापि त्यांची स्थिती नाजूक असल्याने त्यांना शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी घेतला आहे.

दरम्यान संगीता रहाणे यांना उत्तरीय तपासणीसाठी कोपरगाव रुग्णालायत भरती करण्यात आले आहे.त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याना मृत घोषित केले आहे.दरम्यान या घटनेने बहादरपूर परिसरात शोककळा पसरली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close