कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात पिकांचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकऱ्यांचे आदेश
संपादक -नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
नगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून काढणीस आलेल्या सोयाबीन,मका,बाजरी,आदी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.या सर्व पिकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जिल्ह्यातून होत होती या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दोन दिवसात या पिकांचे पंचनामे करावे असे आदेश दिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
वर्तमान स्थितीत हवामानात बदल होवून महाराष्ट्रात पावसाने अपेक्षेहून जास्त काळ राज्यात ठाण मांडले आहे. कोपरगांव तालुका त्याला अपवाद नाही.तालुक्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत सर्व लोकप्रतिनिधी आ. आशुतोष काळे व शेतकऱ्यांनी या अवकाळी पावसाने झालेल्या पावसाचे पंचनामे करावे अशी मागणी अनेक दिवसापासून सुरु ठेवली होती.त्यास अनुसरुन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी,यांनी केलेल्या आदेशा नुसार तहसिलदार योगेश चंद्रे,गटविकास अधिकारी सोमनाथ सोनकुसळे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव आदिनी तालुक्यातील सर्व तलाठी,कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांची आज बैठक घेतली आहे. त्या बैठकीत कोपरगांव तालुक्यात जेथे पिकांचे नुकसान झाले तेथील पिकांचे पंचनामे आज बुधवार दि.३० आँक्टोबर पासून सूरू करण्यात यावेत असे आदेश दिले आहेत.शेतकऱ्यांनी नमुन्यातील अर्ज भरून द्यावेत.त्यावर बँकेचे खाते क्रमांक.आधार क्रमांक आदी बाबी आवश्यक आहे.या आदेशामुळे त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.