कोपरगाव तालुका
रस्ता न केल्याने सोनेवाडी,चांदेकसारेत मतदानावर बहिष्कार ,तालुक्यात खळबळ
कोपरगाव-(प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यात रस्त्यावर साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी खर्च करून तीनशे कि.मी.चे रस्ते केल्याचे सत्ताधारी भाजप आमदारांकडून ढोल वाजवले जात असताना तालुक्याचे वास्तव चित्र चांदेकसारे व सोनेवाडी हद्दीतील एंडकी भागातील रहिवाशांनी समोर आणले असून या ग्रामस्थांनी त्यांच्या वस्तीस जोडणाऱ्या नाला क्रं.29 आनंदवाडी चांदेकसारे ते म्हसोबावाडी या तीन कि.मी. रस्त्यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करूनही तालुक्याच्या लोकप्रतिनिधिंनी त्यांना रस्ता करून न दिल्याच्या निषेधार्थ अखेर साडेसहाशे ते सातशे मतदारांनी उद्या 21 ऑक्टोबर रोजी संपन्न होणाऱ्या मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे.त्याचे निवेदनचं नुकतेच निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके याना दिले आहे.
भारतात लोकशाही नांदत आहे.सर्व समस्या लोकप्रतिनिधींनी पक्षविरहित सोडवाव्या अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे.ग्रामपंचायत सरपंचा पासून ते पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य,आमदार, खासदार त्यासाठी सामान्य जनतेतून निवडले जातात मात्र वास्तव नंतर वेगळेच समोर येत असून त्यावर सामान्य माणसाच्या विश्वास बसणे अवघड आहे.लोकशाही मार्गाने लोकप्रतिनिधींना निवडून देऊन उपयोग होताना दिसत नाही.आमच्याकडे कोणाचेही लक्ष नाही अशी वाईट स्थिती उदभवली आहे.त्यामुळे लोकशाहीवरील आमचा विश्वास उडाला आहे.त्यामुळे आम्ही येत्या 21 तारखेला संपन्न होणाऱ्या विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकणार आहे.तसा फलकही गावाबाहेर लावणार असल्याचा इशाराही दिला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येस साधारण दहा कि.मी. अंतरावर चांदेकसारे हे सुमारे दहा हजार लोकसंख्येचे गाव आहे.या गावाच्या दोन वाड्या असून त्यात आनंदवाडी,व सोनेवाडी यांचा समावेश आहे.या दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याची वाट लागली आहे.त्यातले त्यात आनंदवाडी चांदेकसारे ते म्हसोबावाडी,सोनेवाडी या नाला क्रमांक 29 हा रस्ता या गावाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. त्याची वर्तमानात अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.त्या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी येथील कार्यकर्त्यांनी वारंवार कोपरगावच्या भाजपच्या लोकप्रतिनिधींकडे करूनही उपयोग झाला नाही.त्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.त्यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की.भारतात लोकशाही नांदत आहे.सर्व समस्या लोकप्रतिनिधींनी पक्षविरहित सोडवाव्या अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे.
ग्रामपंचायत सरपंचा पासून ते पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य,आमदार, खासदार त्यासाठी सामान्य जनतेतून निवडले जातात मात्र वास्तव नंतर वेगळेच समोर येत असून त्यावर सामान्य माणसाच्या विश्वास बसणे अवघड आहे.लोकशाही मार्गाने लोकप्रतिनिधींना निवडून देऊन उपयोग होताना दिसत नाही.आमच्याकडे कोणाचेही लक्ष नाही अशी वाईट स्थिती उदभवली आहे.त्यामुळे लोकशाहीवरील आमचा विश्वास उडाला आहे.त्यामुळे आम्ही येत्या 21 तारखेला संपन्न होणाऱ्या विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकणार आहे.तसा फलकही गावाबाहेर लावणार असल्याचा इशाराही दिला आहे.त्याचे निवेदन त्यांनी निवडणूक अधिकारी राहुल मुंडके,तहसीलदार योगेश चंद्रे याना दिले आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे.व भाजप सरकार तोंडघशी पडले असल्याचे निष्पन्न झाले आहे.निवेदनावर राहुल भगीरथ होन, भाऊसाहेब बोंडखळ, नितीन होन, सुनिल बर्डे, शाम खरे,शुभम होन, अमोल सुपेकर,आप्पासाहेब खरे आदींच्या सह्या आहेत.