जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आ. स्नेहलता कोल्हे यांच्या खर्चात तफावत,निवडणूक अधिकाऱ्यांनी पाठवली नोटिस !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगांव (प्रतिनिधी )

विधानसभा निवडणुकीत खर्च वेळेत देणे व त्यात तफावत न ठेवणे बंधनकारक असताना कोपरगाव विधानसभा निवडणुकीत उभे असलेल्या सत्त्ताधारी भाजप च्या उमेदवार आ. स्नेहलता कोल्हे,आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे,अपक्ष उमेदवार विजय वहाडणे व राजेश परजणे यांच्या खर्चात आश्चर्यकारक तफावत आढळली होती तथापि आ. स्नेहलता कोल्हे वगळता अन्य उमेदवारांनी ती तफावत अठ्ठेचाळीस तासात दूर केली असल्याने आ. कोल्हे याना निवडणूक खर्च निरीक्षक के.ए. जतीन यांनी नोटिसा बजावण्याचे आदेश दिल्याने मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

बुधवार दि.१६ आँक्टोबर रोजी सकाळी ११:०० ते ०५:०० या वेळेत संपूर्ण उमेदवारांच्या खर्चाची दूसरी तपासणी करण्यात आली. यात कोल्हे स्नेहलता यांचे निवडणूक खर्चाबाबत तफावत आढळून आल्याने त्यांना निवडणूक खर्च निरिक्षक यांचे सुचने नुसार ४८ तासाचे आत संबंधित खर्चाची तफावत दूर करण्यासाठी नोटीस पाठवली आहे.

विधानसभा निवडणुकीत खर्चा संदर्भात उमेदवारांनी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्च मर्यादा आणि नियमांचे पालन करुन निवडणूक खर्च सादर करतेवेळी खर्चात आणि सादरीकरणात तफावत राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.त्यासाठी सर्व उमेदवारांना निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या असताना कोपरगावात मात्र त्याचे पालन निवडणुकीस उभे असलेल्या उमेदवारांनी पाळलेले नाही अशी बाब आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आहे.त्यावर निवडणूक खर्च निरिक्षक के.ए.जतीन यांनी कोपरगाव येथे बोलताना हा इशारा दिला आहे.

कोपरगांव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च तपासणी शनिवार दि.१२ आँक्टोबर रोजी सकाळी ११:०० ते ०५:०० आणि बुधवार दि.१६ आँक्टोबर रोजी सकाळी ११:०० ते ०५:०० या वेळेत पहिली व दुसरी खर्च तपासणी करण्यात आली. यात दि.१२ आँक्टोबर रोजी १४ उमेदवारांची खर्च तपासणी निवडणूक खर्च निरिक्षक के.ए.जतीन यांनी केली.या तपासणीत कोल्हे स्नेहलता, परजणे राजेश, आशुतोष काळे,विजय वहाडणे या उमेदवारांच्या निवडणूक खर्चात तफावत आढळल्याने निवडणूक खर्च निरिक्षकाचे सुचनेनुसार निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी नोटीस पाठवली आहे..त्यानुसार संबंधित उमेदवाराने निर्धारित कालावधीचे ४८ तासाच्या आत झालेल्या तफावती बाबतीतची अपुर्तता पुर्ण केली.त्या मुळे त्या दिवसापर्यंतचा उमेदवारांच्या खर्चाचा तपशीलातील तफावत दूर झाली आहे.बुधवार दि.१६ आँक्टोबर रोजी सकाळी ११:०० ते ०५:०० या वेळेत संपूर्ण उमेदवारांच्या खर्चाची दूसरी तपासणी करण्यात आली. यात कोल्हे स्नेहलता यांचे निवडणूक खर्चाबाबत तफावत आढळून आल्याने त्यांना निवडणूक खर्च निरिक्षक यांचे सुचने नुसार ४८ तासाचे आत संबंधित खर्चाची तफावत दूर करण्यासाठी नोटीस पाठवली आहे.पुढील खर्च तपासणी रविवार दि.२० आँक्टोबर रोजी सकाळी ११:०० ते ०५:०० या कालावधीत निवडणूक खर्च निरिक्षक के.ए.जतीन हे स्वतः खर्च तपासणी करणार आहे.सदर तपासणी निवडणूक निर्णय अधिकारी, कोपरगांव विधानसभा मतदारसंघ यांचे दालन,तहसिल कार्यालय, कोपरगांव येथे होणार आहे.
या प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे,सहाय्यक खर्च निरिक्षक मनोजकुमार सिन्हा,खर्च नियंत्रक कक्षप्रमुख सुनिल तडवी,सहाय्यक जी.एस.सोनवणे,डि.एस.प्रधान,आर.जे.गाडे,जे.एम.सैद,एन.डी.पवार हे कामकाज पहात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close