नगर जिल्हा
प्रा.डॉ. बाळू वाघमोडे सेट परीक्षा उत्तीर्ण
संपादक- नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव येथिल श्री सद्गुरू गंगागिरी महाविद्यालयातील प्रा.डॉ.बाळू मारुती वाघमोडे हे अर्थशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.त्यांच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
त्यांना चालू वर्षात जन अध्ययन या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त मानांकनातील वृत्तपत्राच्या पुरस्कार वितरण व प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने शैक्षणिक संशोधन क्षेत्रातील कारकीर्द लक्षात घेवून ‘ राजर्षी शाहू महाराज आंतरराष्ट्रीय सन्मान पुरस्कार- २०१९ ’ देवून गौरवण्यात आलेले आहे.
त्यांचे मुळगाव कर्जत तालुक्यातील रेहेकुरी हे आहे. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये सेवा केलेली आहे. त्यांचे आत्तापर्यंत एकूण ५७ संशोधन पेपर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर प्रसिद्ध झालेले असून ते सध्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष भगीरथ शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि. गौतमनगरचे जेष्ठ संचालक अशोक काळे, संस्थेचे कौन्सिल सदस्य राजेंद्र फाळके , सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि. चे अध्यक्ष आशुतोष काळे, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस.आर.थोपटे, उपप्राचार्य प्रा. आर. एस. झरेकर , प्रा. आर.जी. पवार, प्रा.डॉ.व्ही.बी. निकम व शिक्षक आणि शिक्षकेत्तर सेवकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.