जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

स्रेयवादातून घरकुलांची 125 कोटींची रक्कम सत्ताधाऱ्यांमुळे गेली परत-माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचा आरोप

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव नगरपरिषदेचे आपण अध्यक्ष असतांना कोपरगाव शहराच्या विकासासाठी माजी आ. अशोक काळे यांच्या प्रयत्नांमुळे शहर विकासासाठी १२५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता या खेरीज ४२ कोटी रुपयांची पाणी योजना दिली होती. मात्र कोपरगावच्या राजकीय वर्तुळातील काही शुक्राचार्यांनी सत्ता बदल झाल्यावर स्रेयवादातून हा निधी परत पाठविण्यासाठी आपल्या समर्थकांना आंदोलने करण्यास भाग पाडुन त्या निधीवर वरवंटा फिरवला असल्याचा आरोप कोपरगाव नगर परिषदेचे माजी अध्यक्ष व कोल्हे समर्थक मंगेश पाटील यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्याचा कायापालट होणे अतिशय गरजेचे आहे. कोपरगाव शहराला नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी ४ नंबर व ५ नंबर साठवण तलावाचे काम होणे अतिशय गरजेचे आहे. आशुतोष काळे कमी बोलतात मात्र काम जास्त करतात हे आपण अनुभवले आहे. सहकारी साखर कारखानदारी अडचणीत असतांनाही त्यांनी आपला कारखाना तोटामुक्त करून दाखविला- पाटील

कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी कोल्हे गटाचे कट्टर समर्थक असलेले माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला याप्रसंगी ते बोलत होते.

त्यावेळी पुढे पुढे बोलताना म्हणाले की, आज कोपरगाव तालुक्याचा कायापालट होणे अतिशय गरजेचे आहे. कोपरगाव शहराला नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी ४ नंबर व ५ नंबर साठवण तलावाचे काम होणे अतिशय गरजेचे आहे. आशुतोष काळे कमी बोलतात मात्र काम जास्त करतात हे आपण अनुभवले आहे. सहकारी साखर कारखानदारी अडचणीत असतांनाही त्यांनी आपला कारखाना तोटामुक्त करून दाखविला. त्यांच्या सर्वच संस्था आज प्रगतीपथावर आहेत हे उत्तम नेतृत्व असल्याची साक्ष देते त्यामुळे माझी खात्री पटलेली आहे की, ४ नंबर व ५ नंबर साठवण तलावाचे काम फक्त आशुतोष काळेच करू शकतात व शहराच्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकतात असा विश्वासही व्यक्त केला आहे.त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी त्यांचे स्वागत केले व आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close