जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सेवानिवृत्त वरीष्ठ पोलीस निरीक्षक लोखंडे यांचा सत्कार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नागरी हक्क संरक्षण विभाग अहमदनगर विभागात वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे व नुकतेचे सेवानिवृत्त झालेले पोलीस निरीक्षक राजेंद्र राधाकृष्ण लोखंडे यांचा श्री संत सावता माळी युवक संघाचे वतीने जिल्हाध्यक्ष व भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुकाध्यक्ष मुकुंद काळे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्प हार देऊन नुकताच सत्कार करण्यात आला आहे.

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील शेतकरी कुटंबातुन जन्माला आलेले सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांनी जिद्ध आणी चिकाटीच्या जोरावरआलेल्या सर्व संकटांशी सामना करत आपले ध्येय गाठले असुन समाजात आपले एक वेगळस्थान निर्माण केले आहे.त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या प्रसंगी संघाचे कोपरगाव सचिव योगेश ससाणे,रविंद्र आबक,दीनेश बोरनारे व प्रकाशजी जमधडे ऊपस्थित होते.कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावचे भुमिपुत्र असलेले सेवानिवृत पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांचे जनता ईग्लिंश स्कुल संवत्सर,के.जे. सोमय्या महाविद्यालय व एस.एस.जी.एम.महाविद्यालय कोपरगाव येथे झाले आहे.तर सन-१९८९ मध्ये वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर पुढे राज्य स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन १९९० साली महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण पुर्ण करुन १९९१ ते १९९६ पर्यंत नागपुर शहर येथे तर १९९६ ते २००० पर्यंत नाशिक शहर तसेच २००१ ते २००५ पर्यंत औरंगाबाद ग्रामीण २००६ ते २००८जळगाव जिल्हा २००८ ते २०१० ठाणे शहर २०१० ते २०१४ सी.आय.डी.गुन्हे शाखा२०१४ ते २०१७ जात पडताळणी समिती धुळे,नंदुरबार तर शेवटी २०१८ ते ३१ मे २०२१ पर्यंत नागरी हक्क संरक्षण विभाग अहमदनगर येथुन वरीष्ठ पोलीस निरीक्षकपदी सेवा बजावुन सेवानिवृत्त झाले आहेत.

शेतकरी कुटंबातुन जन्माला आलेले लोखंडे यांनी जिद्ध आणी चिकाटीच्या जोरावरआलेल्या सर्व संकटांशी सामाना करत आपले ध्येय गाठले असुन समाजात आपले एक वेगळस्थान निर्माण केले असुन युवकांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे मुकुंद काळे यांनी यावेळी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close