जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात उद्या प्रदेशाध्यक्ष आ. थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसचा निर्धार मेळावा

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा उद्या बुधवार ११ सप्टेंबर रोजी दुपारी ०३ वाजता कोपरगांव शहरातील व्यापारी धर्मशाळेत निर्धार मेळावा आयोजित केला असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी जनशक्तीला दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्येकर्ते, पदाधिकारी, यांच्याशी चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी, व कोपरगाव तालुक्यात लयाला गेलेले संघटन वाढविण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात अनेक महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

या निर्धार मेळाव्याचे निमित्ताने आ. थोरात कोपरगाव शहर व तालुक्याची कार्यकारणी जाहिर करण्याची शक्यता आहे.

या मेळाव्यास विधान परिषद सदस्य आ. डाॅ. सुधीर तांबे, अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दिनांक ११ सप्टेंबर रोजी दुपारी ०३ वा. व्यापारी धर्मशाळा येथे निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला असुन सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी मोठ्या संख्येने यांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवक काँग्रेस चे तुषार पोटे,साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर, कोपरगांव शहर काँग्रेस चे शहराध्यक्ष सुनिल साळुंके, यांनी केले आहे

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close