जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दहीगाव बोलक्यात विहिरीत पडून महिलेचा मृत्यू,शवविच्छेदनास ग्रामीण रुग्णालयाचा नकार !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीत गावाच्या उत्तरेस असलेल्या अनिल बाबासाहेब बागल या शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या विहिरीत वैशाली संदीप अनर्थे (वय-पस्तीस)या महिलेचा विहिरीत पडून नुकताच मृत्यू झाला असून तिच्या सासरच्या मंडळींनी तिचे शव कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासनीस नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने नातेवाईकांना सदरचे शव थेट शंभर कि.मी. असलेल्या नगर येथील ग्रामीण रुग्णालयात न्यावे लागल्याने नातेवाईकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

दरम्यान माहितगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेअकराच्या सुमारास मयत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी सदर महिलेच्या मृत्यस सासरच्या मंडळींना जबाबदार धरल्याने वाद उद्भवला आहे. व सदरची बाब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव शहराच्या पूर्वेस दहिगाव बोलका ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत हद्दीत पूर्वेस असलेल्या अनिल बाबासाहेब बागल यांच्या शेतात असलेल्या विहिरीत चार सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एक शव तरंगत असल्याचे त्यांचे लक्षात आले त्यांनी या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या बाबतची रितसर खबर दिली त्यानंतर तालुका पोलिसांनी या बाबत रीतसर पंचनामा केला.त्यानंतर सदरचे शव शवविच्छेदन करण्यासाठी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उशीर झाला असल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदरचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला त्यामुळे नातेवाईक हवालदिल झाले त्यांनी उशीर होणार असल्याने सदरचे शव नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा नाईलाजाने निर्णय घेतला असला तरी येथील सामान्य नागरिकांना शवविच्छेदनास जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची नामुष्की यावी हे दुर्दैव असून सामान्य माणसास या रुग्णालयाकडून न्याय मिळणार आहे कि नाही हा खरा प्रश्न आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. राजेंद्र म्हस्के हे करीत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close