निधन वार्ता
माजी नगरसेविका जपे यांचे निधन

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका ताराबाई गणपत जपे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले आहे.त्यांना उपचारार्थ छ्त्रपती संभाजीनगर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.मात्र तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याना त्यांना वाचविण्यात अपयश आले आहे.त्यांच्या पश्चात भाजपचे कार्यकर्ते दिपक जपेंसह तीन मुले सूना,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

स्व.ताराबाई जपे या सन-२०१६ नोव्हेंबर मध्ये संपन्न झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने खडकी या प्रभाग क्रं.एक मधून निवडून आल्या होत्या.त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे चिरंजीव दिपक जपे यांनी सांभाळली होती.त्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून होती.त्यात मोठ्या मताधिक्याने विजय वहाडणे हे विजयी झालेले होते.तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी त्यांच्या कार्यकाळात महिला दिनाच्या दिवशी त्यांना नगराध्यक्षपदाचा मान दिला होता.त्यावेळी स्व.ताराबाई जपे यांनी समाधान व्यक्त केले होते.त्या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या म्हणून खडकी आणि कोपरगाव शहर परिसरात परिचित होत्या.त्यांचेवर कोपरगाव येथील गोदावरीतीरी असलेल्या अमरधाम येथे शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
त्यांच्या निधनाने माजी आ.स्नेहलता कोल्हे,संजीवनी सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.