जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

रेणुकादेवी ट्रस्ट बळकविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न,मोदी मंचचा खळबळजनक आरोप!

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सर्व ठिकाणी आपल्याच परिवाराची सत्ता हवी या अविचाराने कोपरगाव तालुक्यातील एक सत्ताधारी घराण्याला पछाडले असून त्यानी कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील प्राचीन देवी मंदिर ट्रस्टवर कब्जा करण्यासाठी प्रयत्न चालविल्याचा खळबळजनक आरोप कोपरगाव तालुका नरेंद्र मोदी मंचचे अध्यक्ष सुभाष दवंगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकान्वये पुढे म्हटले आहे कि,कोपरगाव तालुका सध्या प्रस्थापित नेत्यांच्या मगरमिठीत सापडला असून या सत्ताधारी कुटुंबाला सत्तेची खूपच हाव सुटली असून साई संस्थानवर आपल्याच कुटुंबातील सदस्य पाहिजे तर अन्य पदावरही आपल्याच कुटुंबातील व नातेवाईक त्यांना हवे असून मुलायमसिंग यादव यांच्या नंतर त्यांचाच क्रमांक लागण्याची शक्यता आहे.मुलायमसिंगांनी घरातीलच व नात्यातील जवळपास त्रेपन्न जणांना राजगादीवर बसवले होते पुढे परिणाम काय झाला हे सांगण्याची गरज नाही.तशीच सत्तेची हाव कोपरगावातील सत्ताधाऱ्यांना सुटली असून त्यांनाच केंद्रातील पदे लागतात तर राज्यातील अन्य पदे व सहकाराची सर्वच पदे त्यांना हवी आहेत.आता राजकीय पदे या कुटुंबाने पादाक्रांत केली आहेच पण आता देवस्थानाकडे त्यांची वक्र दृष्टी वळली आहे.कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव हे रेणुकादेवीचे प्राचीन स्थान आहे.स्थानाकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला असून

कोपरगाव तालुक्यातील “उक्कडगाव” येथील श्री रेणुकादेवी देवस्थान ट्रस्ट या पवित्र ट्रस्टमध्येही घुसखोरी करण्याचा किळसवाणा प्रयत्न चालविला आहे.काही चेल्या चपाट्याना पुढे करून ट्रस्टवर ताबा मिळविण्यासाठी कागदी घोडे नाचवायला सुरवात झालेली आहे.एक राजपुत्र,एक त्यांचा स्वियसहाय्यक हे श्री रेणुकादेवीची पुजा करण्यासाठी तळमळ करताहेत. स्थानिक गावकऱ्यांवर दबाव आणून,विश्वस्थात फुट पाडून,वरिष्ठ शासकिय अधिकाऱ्यांवर दबाव आणून,सहकारातील बेहिशोबी कमाईचा दुरूपयोग करून या परिवाराने तालुक्यात उन्मत्तपणा चालविलेला आहे. अशा दानवी प्रवृतींनी निदान धार्मिक ठिकाणे तरी सज्जनांसाठी मोकळी ठेवावीत.यांची कार्यपद्धतीत त्याना स्वतःचेच पुतणेही चालत नाहीत.कार्यकर्ते लाचार करून ठेवले असून त्यांचा तर पदांसाठी विचारही होऊ शकत नाही,तेही खाली माना घालून नेत्यांचा उदोउदो करण्यात मग्न आहेत.तेही बोलणार नाहीत.कारण अनेक भाटांना घरपोच पाकिटे चालू असल्याचा आरोप सुभाष दवंगे यांनी शेवटी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close