जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

जवळके येथे बडोदा बँकेच्या सूक्ष्म बँकिंग सुविधा केंद्राची सुरुवात

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकेच्या सूक्ष्म बँकिंग सुविधा केंद्राचा नुकताच शुभारंभ बडोदा बँकेच्या कोपरगाव शाखेचे व्यवस्थापक पुष्कराज गौतम यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आहे.त्यावेळी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.नागरिकांनी या साई समीक्षा सुविधा केंद्राचे स्वागत केले आहे.

बडोदा बँकेच्या सुविधा या नागरिक व ग्राहंकाच्या सोयीसाठी असून केंद्रचालकांनी बँक व ग्राहकांचा विश्वास संपादन करून आपली सेवा पुरवावी काही अडचणी असतील तर बँकेशी संपर्क साधावा.दहा हजारापर्यंत या ठिकाणी व्यवहार करता येतील-पुष्कराज गौतम,व्यवस्थापक,बडोदा बँक,कोपरगाव शाखा.

बँकिंग व्यवसायाचा विस्तार वेगाने होत असताना ग्राहकसेवेवर ताण पडत आहे.स्पधेर्मुळे ग्राहकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.प्रचंड शाखाविस्तार,लाखोंच्या संख्येने ग्राहक,नवनवीन योजना व सेवा यामुळे बँकिंग व्यवसायही गुंतागुंतीचा होत असून ग्राहक सेवेसंंबंधी ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. ग्राहकसेवा सुधारावी,त्याचा दर्जा उंचवावा,दर्जाचे सातत्याने मूल्यमापन व्हावे,कामाच्या पद्धतीत सुधारणा व्हाव्यात,कमीत कमी वेळात सेवा पुरवल्या जाव्यात यासाठी एक नियामक म्हणून रिर्झव्ह बँक सतत प्रयत्नशील व दक्ष असते.ग्राहकहीत केंदस्थानी ठेवूनच नियमन करत असते.समाधानकारक सेवा हा आपला हक्क डावलला जात असल्याचा समज सर्वदूर ग्राहकांकडे परसला असून ग्राहकांचे सबलीकरण करायला हवे असे रिर्झव्ह बँकेला प्रकर्षाने जाणवते.यासाठीच ग्राहक सेवेसंंबंधी अनेक सूचना रिर्झव्ह बँक वेळोवेळी करत असते व या सूचनांची अमलबजावणी करणे बँकांना बंधनकारक असते.या बँकेच्या सूचनांप्रमाणे नुकत्याच बँक सुविधा केंद्राची रचना करण्यात आली असून राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण पातळीवर पोहचण्यासाठी या सुविधा केंद्राची रचना करण्यात आली आहे.ग्राहक केंद्रस्थानी ठेऊन या सुविधा पुरविण्यात येत आहे.जवळके या ठिकाणी ग्राहक केंद्राची नुकतीच सुरुवात करण्यात आली असून त्याचे उदघाटन बडोदा बँकेचे कोपरगाव शाखेचे व्यवस्थापक पुष्कराज गौतम यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

सदर प्रसंगी बँकेचे अधिकारी उत्कर्ष शर्मा,दिपक पवार,उद्योजक बाबाजी टेमगिरे,सरपंच बाबुराव थोरात,बहादरपूरचे माजी सरपंच कैलास रहाणे,भास्कर थोरात,काशिनाथ शिंदे,गोरक्षनाथ शिंदे,अण्णासाहेब शिंदे,तुकाराम गव्हाणे,दगडू रहाणे,कानिफनाथ गव्हाणे,पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजी गायकवाड,नवनाथ शिंदे,केंद्रचालक ऋत्विक शिंदे,गीताराम पाचोरे,आदी मान्यवरांसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नानासाहेब जवरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुविधा केंद्रचालक ऋत्विक शिंदे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close