कोपरगाव तालुका
वाल्मिक नेहे यांना पितृशोक

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी व प्रगतशील शेतकरी सोपान वामन नेहे (वय-८२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,मुलगा तथा निळवंडे कालवा कृती समितीचे जेष्ठ कार्यकर्ते वाल्मिक नेहे,दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचा दीड महिन्यांपूर्वी किरकोळ अपघात झाला होता त्यात त्यांच्या पायाला मोठी इजा झाली होती त्यातून ते सावरले होते मात्र त्यांना चालण्यास आत्मबळ न मिळाल्याने त्यातच त्यांची शनिवार दि.२३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्यावर धोंडेवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.