जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील खोटा अपप्रचार थांबवा-नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

-दि.३० ऑक्टोबर २०१० मध्‍ये ज्यांनी ठराव केला कि आरक्षित जमीन संपादित करण्यासाठी फार मोठी रक्कम लागते नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ही जमीन संपादित करता येणार नाही.तरीही सर्वे नं. २१० वरील आरक्षण का उठविले असे मलाच विचारणाऱ्यानीच माजी नगरसेवक बबलू वाणी यांच्या भूखंडावरील आरक्षण उठविण्याचा विषय का मंजूर केला ? स्वतःजवळच्या व्यक्तींना एक न्याय व गिरमे परिवाराच्या आरक्षण उठविण्यालाच विरोध का? खोटी व अपुरी माहिती देऊन पत्रकबाजी करणारे नगरपरिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अपप्रचार करत आहेत.

माझ्यावर कर्ज आहे पण मी कर्ज बुडविणारा नाही. कारण आपण ०३ लाख रूपये कर्जापैकी पन्नास हजार रू. याच महिन्यात बँकेत भरणा केला आहे.तुमच्याच मर्चंट बँकेत आमच्या भारत माता पतसंस्थेचे ५० लाख रू.अडकलेले आहेत. वडिलांचे निधन त्यांच्या नावाची बँक खाऊन तुम्ही तुरुंगात जाऊन बसले. पण आपण मात्र माझ्या वडिलांच्या निधनानंतर शहरवासीयांच्या मदतीने नगराध्यक्षपदी जाऊन बसलो. छातीठोकपणे सांगतो १० झाली नव्हती इतकी कामे शहरात झाली आहेत-होत आहेत.पण तुम्ही राजकिय स्वार्थापोटी नाहक अडथळे आणत आहात.
श्रीमान सातभाई व माझ्यात मात्र एक साम्य आहे. ते व मी दोघांनीही तुरुंगाची हवा खाल्लेली आहे. ते बँक खाल्ली म्हणून तुरुंगात गेले व मी जनतेच्या प्रश्नांसाठी अनेकदा तुरुंगवास पत्करला. माझे वडिल आमदार-खासदार-नामदार होते तरीही मी कर्जबाजारी आहे. मी सातभाई यांची बरोबरी करूच शकत नाही.
विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मला मान्य आहे, कारण मी सामान्य कार्यकर्ता आहे.सातभाई मात्र फार लोकप्रिय आहेत.कारण देशभर मोदींची लाट असताना सातभाईंच्या प्रभागात मात्र भाजपा भुईसपाट झाला.तुमच्या प्रभागात फारच कमी मते पडल्यानेच माजी आमदार ताईंचा पराभव झाला, याची तुम्हाला शरम वाटत नाही का?
तुमच्याच काळात येसगाव तळ्यातील मासे पकडण्याचा ठेका (१ लाख ०६ हजार रू. वार्षिक) ५ वर्षांसाठी दिला होता.आपण मात्र तोच ठेका (१४ लाख १४ हजार रू.वार्षिक) दिला. तुम्ही याच ठेक्यात भानगड केल्याने कोपरगाव नगरपरिषदेचे ५ वर्षात ६५ लाख रू. नुकसान झाले.आपण ठेक्यात भानगडी न केल्याने नगरपरिषदेला किमान ७० लाख रू.लाभ झाला.
पत्रके वाटून रस्त्यांच्या टेंडरबद्दल कितीही बदनामी करा. पण सर्व जनतेसाठी या टेंडरची कागदपत्रे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. खरे खोटे जनता ठरवेल. टेंडर चुकीचे असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. सर्वजण मिळून आपण मला घेरण्याचा कितीही प्रयत्न करा, जनता मात्र सूज्ञ आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close