जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

बरोबर येत नसल्याने दोघांना बेदम मारहाण,कोपरगावात दोघांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील तीळवणी ग्रामपंचायत हद्दीतील साई माया ढाब्यावर जेवणास गेलेल्या राहुल कैलास कदम यास तू आमच्या बरोबर आता का येत नाही असे म्हणून आरोपी भागवत भारम भोसले व त्याच्या बरोबर असलेला त्याचा सहकारी अविनाश भोसले व त्यांचे अन्य दोन सहकारी यांनी लाकडी दांडक्याने आपल्याला व आपल्या सहकाऱ्यांस बेदम मारहाण केली असल्याची फिर्याद संजय नानासाहेब कदम यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.

नानासाहेब कदम यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आपण व आपला सहकरी राहुल कदम आम्ही दोघे तीळवणी येथे हॉटेल साई माया येथे रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास गेलो असता तेथे आरोपी भागवत भोसले व अविनाश भोसले हे आणखी दोन अनोळखी सहकाऱ्यांना घेऊन आले व आपला सहकारी संजय कदम यास तू आता आमच्या सोबत का राहत नाही असे म्हणाला. कदम याने त्यास नकार दिल्याने त्याने त्यास व मला अशा दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण केली व तुला आता मी जिवंत सोडत नाही म्हणून संजय कदम यास बेदम मारहाण केली.व भ्रमणध्वनी व दुचाकींचा इंडिकेटर फोडला असल्याची फिर्याद दाखल केली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींसह अन्य दोन अनोळखी आरोपींवर गु.र.नं.११२/२०१९ भा.द.वि.कलम -३२६,५०४,५०६,४२७,३३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्री पवार हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close