जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात सेनेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

माझे कुटुंब माझी जबाबदारी’अभियानामुळे कोरोना आटोक्यात येत असला तरी सध्या राज्यभरात रक्तपुरवठ्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे.म्हणुन
शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला साथ देत शिवसेनेच्या युवा शाखे मार्फत कोपरगांव विधानसभा क्षेत्रात आज कोरोनाचे अटीचे पालन करत तातडीने पुन्हा एकदा महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले व सर्व शिवसैनिक युवा सैनिकांनी रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद दिला आहे.

संजीवनी ब्लड बँक येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले आहे.संजीवनी ब्लड बँकेच्या संचालक पाटील मँडम यांनी सर्व शिवसैनिक व युवासैनिक रक्तदात्यांचे आभार मानले व माजी शिवसेना शहरप्रमुख सनी वाघ यांनी कोपरगाव शहरातील युवकांना जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आव्हान केले व यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख मनोज कपोते, शिवणारायन परदेशी,माजी शहरप्रमुख सनी वाघ,ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख रवि कथले,उपजिल्हाप्रमुख गणेश जाधव युवासेना शहरप्रमुख नितीश बोरुडे, युवासेना तालुकाप्रमुख सिद्धार्थ शेळके,उपशहरप्रमुख नाना जाधव,उपशहर संघटक सागर फडे,सनी काळे, वसीम चोपदार,शेखर बोरावके युवासेना उपशहरप्रमुख ऋषिकेश धुमाळ,प्रितेश जाधव,उपतालुक प्रमुख विजय भोकरे,प्रशांत बोरावके,निलेश जगदाळे, प्रसाद निकम,दीपक कराळे,सनी डिंबर,गणेश शिंदे,गणेश पाटील,ज्ञानेश्वर मगर,प्रसाद ताकवले,अभि सुरवंशी,मुनेश गुप्ता,वसीम पटेल,सिद्धार्थ खंडांगळे, सोमनाथ आहिरे,अनिल गायकवाड,शुभम लासुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close