जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

तब्बल सहा वर्षानंतर आ. काळे-खा.लोखंडे एकत्र !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या उभारण्यासाठी बँकांनी कर्ज उपलब्ध करून त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.सदाशिव लोखंडे यांनी कोपरगाव येथील जिल्हा बँकेच्या कोपरगाव शाखेच्या सभागृहात आयोजित एका बैठकीत बोलताना केले आहे.दरम्यान २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच खा.लोखंडे व माजी.आ. काळे गट व माजी स्वीयसहाय्यक प्रमोद लबडे हे एकत्र आलेले दिसून आले आहे.त्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान सहकारी बँकेच्या अठरा टक्के व्याजाच्या कारभारावर खा.सदाशिव लोखंडे यांनी प्रथम चांगलेच ताशेरे ओढले व एका सहकारी बँकेच्या व्यवस्थापकांना उभेकरून त्यांनी जाबसाल केला मात्र ती बँक आ. काळे यांची असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी लागलीच “यू”टर्न घेतला व शेतकऱ्यांचीच बँक असल्याची बतावणी केली व जाऊ द्या ! म्हणून विषय सोडून दिला त्यावेळी अनेकांना आपल्या डोक्याला हात लावण्याचा अनास्था प्रसंग उद्भवला आहे.

दरम्यान या ठिकाणी खा.सदाशिव लोखंडे व आ. आशुतोष काळे हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर निवडणुकीच्या आर्थिक कारणावरून फिस्कटल्यावर प्रथमच सहा वर्षानंतर एका व्यासपीठावर आलेले दिसून आले.तीच बाब माजी.आ. काळे यांचे स्वीय सहाय्यक तथा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद लबडे व आ. आशुतोष काळे यांचे पिताश्री माजी आ.अशोक काळे यांच्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर बिनसले होते.त्या नंतर त्यांच्यात विस्तव जात नव्हता मात्र ते यावेळी प्रथमच एकत्र आलेले दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या दिसल्या आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांना कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा देणारा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. कोरोनाच्या संकटात निधी अभावी राज्यातील जवळपास ११ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी अद्याप होऊ शकली नाही.अशा थकीत कर्ज असलेल्या शेतकर्‍यांसह सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी नवं कर्ज देण्याच्या सूचना राज्य सरकारने जिल्हा बँकांसह व्यापारी आणि ग्रामीण बॅंकांना दिल्या आहेत.या शेतकर्‍यांच्या कर्जाची थकीत रक्कम ‘शासनाकडून येणे’ असं दर्शवून शेतकऱ्यांना नवं कर्ज देण्याच्या बँकांना सूचना दिल्या आहेत.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकूण ६० टक्के अंमलबजावणी झाल्याची माहिती आहे. या योजनेअंतर्गत ३२ लाख खातेदारांना लाभ देणे अपेक्षित आहे. मार्च २०२० अखेरीस १९ लाख कर्ज खात्यांमध्ये १२ हजार कोटी शासनाने भरले आहेत.निधी अभावी ११.१२ लाख खातेदारांना ८ हजार १०० कोटी लाभ देणे बाकी आहे. असं असताना आता खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळणार की नाही ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला होता. मात्र आता शासनाच्या या निर्णयाने राष्ट्रीयकृत बॅंका वगळता इतर बॅंकांच्या कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना नवं कर्ज भेटू शकणार आहे.मात्र कोपरगाव तालुक्यातील सहकारी व राष्ट्रीयकृत बँका व त्यांचे अधिकारी अद्यापही त्यावर कारवाई करताना दिसत नाही या पार्श्वभूमीवर खा.सदाशिव लोखंडे यांनी हि बैठक आयोजित केली होती.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. आशुतोष काळे हे होते.

या वेळी उत्तर जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद लबडे,तालुका अध्यक्ष शिवाजी ठाकरे,माजी शहर प्रमुख भरत मोरे,अस्लम शेख यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली व शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देण्याची मागणी केली.शेतकरी भिकारी म्हणून व्यवहार करू नये.तालुक्याच्या नैऋत्येकडील जवळके,रांजणगाव देशमुख परिसरातील अवर्षण तेरा गावांना कोणतीच बँक कर्ज देत नाही.त्या शेतकऱ्यांना कोणी वाली नाही.या भागात आता आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे.राष्ट्रीयकृत बँकेची एकही शाखा नाही ती तातडीने सुरु करावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी या वेळी केली.

सदर प्रसंगी खा.सदाशिव लोखंडे,आ. आशुतोष काळे,कोपरगाव पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,उत्तर नगर जिल्हा शिवसेना अध्यक्ष प्रमोद लबडे, राहुल रोहमारे,बाजार समिती संचालक भरत बोरणारे,सेनेचे माजी शहराध्यक्ष भरत मोरे,कोपरगाव शहर सेनेचे अध्यक्ष सनी वाघ,अस्लम शेख,आदी मान्यवर उपस्थित होते.

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की.ग्रामीण भागात अर्थव्यवस्था शेतकऱ्यांवर अवलंबून आहे.शेतकऱ्याला सन्मान दिला नाही तर आपल्याला मुबलक धनधान्य मिळणार नाही.शेतकरी सातत्याने आपल्यासाठी सर्व हंगामात राबत असतो.याची अधिकाऱ्यानी जाणीव ठेवावी.शेतकरी सुखी तर सर्व जग सुखी या सूत्राची जाणीव ठेवावी.शेतकरी कोणालाही फसवत नाही.ग्रामीण भागातील सेवा सोसायट्यांनीं केवळ सभासादांपुरते आपले व्यवहार मर्यादित ठेऊ नये.बिगर सभासद शेतकऱ्यांना कर्ज देऊन सभासद करून घ्यावे.केवळ आपल्या स्थानिक राजकारणासाठी शेतकऱ्यांना नाडवू नये.शेतकरी सधन असले तरच कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढेल प्रत्येक शेतकऱ्याला तीन लाखांचे कर्ज खरिपाच्या देता येत असल्याचेही त्यांनी सांगितले व वारस नोंदी लावण्यासाठी अधिकाऱ्यानी टाळाटाळ करू नये अन्यथा कारवाई करू असा इशारा देऊन शेतीखेरीज ग्रामीण भागात उद्योग व्यवसायांनाही मुद्रा लोण मधून कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.व सहकारी बँकेने केवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खुश करू नये अशी कोपरखिळीही आ. काळे यांचेकडे पाहून मारली आहे.

या प्रसंगी आ.आशुतोष काळे यांनी महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेला बँकेच्या अडथळा निर्माण झाला आहे.त्यामुळे ४८ हजार लोकांना लाभ मिळाला नाही.अनेक शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती योजनेत नाव आहे मात्र त्याना सरकारने जाहीर करूनही नवीन कर्ज योजनेचा लाभ मिळत नाही.असा आरोप केला.हवामान आधारित पीकविमा योजनेच्या नियम अटी क्लिष्ट असल्याने त्याचा शेतकऱ्यांना लाभ होत नसल्याचा आरोप केला.व शेतकऱ्यांना व त्यांच्या उच्च शिक्षित तरुणांना शेती खेरीज इतर उद्योगाला कर्ज देऊन सन्मानाची वागणूक देण्याचे आवाहन केले.उप्पस्थितांचे आभार राहुल रोहमारे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close