कोपरगाव तालुका
समृद्धीने स्थानिक रस्ते नादुरुस्त,तक्रारींचा पाऊस !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे अनेक प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान व खराब झालेल्या रस्ते दुरुस्तीकडे समृद्धी महामार्ग व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे ज्या ज्या गावात समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे त्या गावातील प्रकल्पाबाधित्यांच्या तक्रारी आहे.त्या तात्काळ दूर करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी गायत्री प्रोजेक्टस कंपनीचे उपाध्यक्ष के.एस.रेड्डी यांना नुकत्याच दिल्या आहेत.
मुख्य रस्ते व गावातील इतर रस्त्यावरून गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीचे अवजड वाहने जात असल्यामुळे आज या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाले असून सर्वत्र प्रचंड धूळ असल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी यावेळी मांडल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यात जात असलेल्या समृद्धी महामार्गामुळे ज्या ठिकाणी प्रत्यक्षात काम सुरु आहे त्या परिसरातील रस्त्यांची वाट लागली आहे.समृद्धी महामार्गाचे काम सुरु असतांना ज्या रस्त्यांचा वापर होणार आहे त्या रस्त्यांची दुरुस्ती करणे गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीला बंधनकारक आहे तरीही रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून समृद्धी महामार्गाचे काम अत्यन्त मंद गतीने सुरू आहे.त्याबाबत शेतकरी व ग्रामस्थांनी आ.काळे यांच्याकडे आपल्या तक्रारीचा पाढा वाचला होता.या पार्श्वभूमीवर कर्मवीर काळे कारखान्यावर आढावा बैठकीचे आययोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी एम. एस.आर.डी. सी. चे मुख्य कार्यकारी संचालक राधेशाम मोपलवार,अधिक्षक अभियंता निघोट, प्रांत विठ्ठल सोनवणे,गायत्री प्रोजेक्टस कंपनीचे उपाध्यक्ष के.एस.रेड्डी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,चारुदत्त सिनगर,रोहिदास होन आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी मुख्य रस्ते व गावातील इतर रस्त्यावरून गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीचे अवजड वाहने जात असल्यामुळे आज या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाले असून सर्वत्र प्रचंड धूळ असल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी यावेळी मांडल्या होत्या. तसेच आ.काळे यांनी नुकतीच एम. एस.आर.डी. सी. चे मुख्य कार्यकारी संचालक राधेशाम मोपलवार यांची भेट घेतली. खराब झालेल्या रस्त्यांच्या समस्येत लक्ष घालून खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याबाबत गायत्री प्रोजेक्टस कंपनीला आदेश द्यावेत अशी मागणी केली.