जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुकाशैक्षणिक

..या पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटच्या निकालाची परंपरा राखली

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुबई यांचे वतीने २०२० मध्ये कोविड १९ मुळे ऑनलाईन घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल नुकताच हाती आला त्यात कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुच्या परीक्षेचा सर्वच विभागांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.त्यात विद्यार्थ्यांनी या वर्षी लक्षवेधी निकालाची परंपरा कायम ठेऊन १००टक्के निकाल लागला आहे.यात शिंदे समाधान बाळासाहेब ह्याने ९८.११ टक्के गुण मिळवुन प्रथम आला आहे

तृतीय वर्षाचा एकूण शेकडा निकाल एकूण १०० टक्के एवढा लागला असून यामध्ये तृतीय वर्ष मॅकेनिकल प्रथम क्रमांक चि.समाधान बाळासाहेब शिंदे ९८.११ टक्के, तृतीय वर्ष इलेक्ट्रीकल विभागात प्रथम क्रमांक, काळोखे अनिल भाऊसाहेब ९६.८८ टक्के, तृतीय वर्ष कॉम्प्युटर विभागात प्रथम क्रमांक कु.श्रद्धा सुरेश चांदगुडे ९३.४३ टक्के, सिव्हील विभागात प्रथम क्रमांक चि. सुरज रंगनाथ कोल्हे ९१.०० टक्के, तृतीय वर्ष अॅटोमोबाईल विभागात प्रथम क्रमांक चेतन रामनाथ शिंदे ८५.२७ टक्के गुण याने मिळविला आहे.

महाविद्यालयाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे,विश्वस्त व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, मानद सचिव चैताली काळे, सहसचिव स्नेहलताई शिंदे, तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, प्राचार्य सुभाष भारती सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Close