कोपरगाव तालुका
कोपरगाव नजीक ट्रकची दुचाकीस धडक,दोन जखमी

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरानाजीक असलेल्या कोपरगाव बेट भागात नगर-मनमाड या राज्य मार्गावर ट्रकवरील (क्रं.टि. एन.०४ ए.एल.५३४४) चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगईने चालवून समोरून येणाऱ्या पाई जाणाऱ्या इसमास धडक देऊन फिर्यादी ग्रामसेवक संग्राम गोकुळदास बोर्डे वय-३६, रा.पुणतांबा ता.राहाता यांना धडक देऊन गंभीर जखमी केले असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
तामिळनाडू येथील ट्रक हा कातकडे पेट्रोल पंपावरून आपले समोर चालणारे इसमास धडक देऊन ट्रक अचानक उजव्या बाजूस वळवला त्यावेळी आपण ट्रॅकचे उजव्या बाजूने जात असताना आपल्या व आपल्या मोटार सायकलला जोराची धडक दिली आहे.त्यामुळे आपल्या उजव्या हाताच्या करंगळीस व शेजारचे बोटास गंभीर दुखापत झाली आहे.उजव्या गुडघ्यास गंभीर दुखापत झाली आहे.तर अन्य एका नागरिकास दुखापत केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी संग्राम बोर्डे हे भोजडे व शिरसगाव येथे ग्रामसेवक या पदावर कार्यरत त्यांच्याकडे हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स हि मोटारसायकल (क्रं.एम.एच,१७ बी.ए.७७९०)आहे.हिच्यावरून दि.१७ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता कोपरगाव कडून पुणतांबा रोडच्या दिशेने जात होते.वरील क्रमांकाचा तामिळनाडू येथील ट्रक हा कातकडे पेट्रोल पंपावरून आपल्या समोर चालणारे इसमास धडक देऊन ट्रक अचानक उजव्या बाजूस वळवला त्यावेळी आपण ट्रॅकचे उजव्या बाजूने जात असताना आपल्या व आपल्या मोटार सायकलला जोराची धडक दिली आहे.त्यामुळे आपल्या उजव्या हाताच्या करंगळीस व शेजारचे बोटास गंभीर दुखापत झाली आहे.उजव्या गुडघ्यास गंभीर दुखापत झाली आहे.व पायी जाणाऱ्या दुसऱ्या मतिमंद इसमास कपाळावर जोराचा मार लागून तो जखमी झाला आहे.त्या वेळी आपल्याला ओळखीच्या नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून नजीकच्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.७७२/२०२० भा.द.वि.कलम २७९,३३७,३३८,४२७,मोटर वाहन कायदा कलम १८४,१३४,१७७ प्रमाणे वरील ट्रकच्या अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.ए. एम.दारकुंडे हे करीत आहेत.