कोपरगाव तालुका
कोपरगावात अल्पवयीन मुलाचे अपहरण
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील बाजार तळावरील रहिवाशी असलेल्या आपला मुलगा अविष्कार विनोद मैले (वय-१७) याचे आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असल्याची फिर्याद विनोद चंद्रकांत मैले (वय-४७) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
अपहरीत अल्पवयीन मुलाला पब्जी खेळण्याची आवड होती.दि.१६ ऑक्टोबर रोजी त्याच्या या नादात तो कायम दंग राहात असल्याने त्यांच्याकडील भ्रमणध्वनी घरच्या नातेवाईकांनी काढून घेतला होता.व त्यास पब्जी खेळण्यास प्रतिबंध केला होता.व अभ्यास करण्यास सांगण्यात आले होते.तू मोबाईल खेळणार असशील व पेपर देणार नसशील तर तुझ्याकडचा मोबाईल काढून घेऊ म्हणून धमकी देऊन नंतर तो काढून घेतला होता.त्यानंतर हि दुर्घटना घडली आहे.
कोपरगाव शहरात फिर्यादि विनोद चंद्रकांत मैले हे बाजार तळावरील रहिवाशी असून त्यांचा रंगकामाचा व्यवसाय आहे.ते तेथे आपले वडील,आई,व सात वर्षाची मुलगी व सतरा वर्षाचा मुलगा असे एकत्र कुटूंबासमवेत राहतात.अपहरीत अल्पवयीन मुलगा हा संजीवनी इंजिनिअरिंग येथे कॉम्प्युटरचा पदविका कोर्स करतो.त्याला पब्जी खेळण्याची आवड होती.दि.१६ ऑक्टोबर रोजी त्याच्या या नादात तो कायम दंग राहात असल्याने त्यांच्याकडील भ्रमणध्वनी घरच्या नातेवाईकांनी काढून घेतला होता.व त्यास पब्जी खेळण्यास प्रतिबंध केला होता.व अभ्यास करण्यास सांगण्यात आले होते.तू मोबाईल खेळणार असशील व पेपर देणार नसशील तर तुझ्याकडचा मोबाईल काढून घेऊ म्हणून धमकी देऊन नंतर तो काढून घेतला होता.त्या नंतर आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अविष्कार हा काही न सांगता घरातून निघून गेला आहे.त्याचा जवळच्या नातेवाईकांकडे शोध घेऊनही तो मिळून आला नाही.त्याच्या अंगात भगव्या रंगाचा ‘टि’ शर्ट असून त्याने राखाडी रंगाची विजार परिधान केली आहे.त्याचे कोणा तरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले असल्याची फिर्याद मुलाचे वडील विनोद मैले यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.७७६/२०२० भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एच.गायमुखे हे करीत आहेत.