जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शेतमालाचे वर्गीकरण हि बाब अत्यावश्यक-आवाहन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला चांगला दर हवा असल्यास त्या शेतमालाचे वर्गीकरण हि महत्वाची बाब असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची विगतवारी करण्यासाठी धान्य स्वच्छता करण्याचे मशीन व प्रक्रिया यंत्राचा वापर करावा असे आवाहन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव येथील एच.डी.एफ.सी.बँकेच्या सहाय्याने “परिवर्तन सामुदायिक विकास प्रकल्प”कार्यक्रम अंतर्गत कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथे जीवनरेखा कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी या शेतकरी महिला संचलित शेतकरी उत्पादक कंपनी च्या धान्य ग्रेडिंग क्लिनिंग आणि प्रोसेसिंग युनिट चे उद्घाटन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच मनिषा गवळी या होत्या.

याप्रसंगी कोपरगाव पंचायत समिती सभापती कोपरगाव पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,मंडळ कृषी अधिकारी श्रीमती माधुरी गावडे,कृषी सहाय्यक वसंत पावरा,परिवर्तन संस्थेचे व्यवस्थापक रमेश बादाडे,जीवन रेखा कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी च्या सर्व महिला संचालिका,तसेच संतू गवळी,चिमणराव गवळी व रामराव गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्री करतांना अधिकृत परवाना धारक व्यापाऱ्यांनाच विकला पाहिजे परिणाम स्वरूप त्यांची फसवणूक होणार नाही असे आवाहन केले.चालू वर्षी अनेक शेतकऱ्यांना खराब सोयाबीन बियाणे मिळाल्यामुळे त्यांचे नुकसान झाले होते.हे युनिट सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध होणार आहे.ग्रामीण भागातील महिलांनी कृषी क्षेत्रात यानिमित्ताने टाकलेले पाऊल स्वागतार्ह असून त्याबद्दल सर्व महिला भगिनींचे त्यांनी कौतुक केले तसेच या युनिटसाठी स्वमालकीची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आ.काळे यांच्या हस्ते प्रकाश गवळी यांचा सत्कार करण्यात आला.या युनिटच्या माध्यमातून भविष्यात कृषी सेवा केंद्र,शेती माल खरेदी,शेती उपयोगी साहित्य व अवजारे विक्री व सुविधा केंद्र,महिला बचत गटाची उत्पादके विक्री,करार शेती-शेवगा व ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.शेती मालाची प्रतवारी करून शेती मालाला योग्य भाव मिळण्यासाठी धान्य साफ सफाई युनिटची स्थापना करण्यात आली आहे.सोबतच कंपनीद्वारे सोयाबीन खरेदी सुरु करण्यात आली आहे आज पर्यंत १६० क्वि.खरेदी केली असल्याचे यावेळी युनिटच्या संचालकांनी सांगितले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close