जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव पोलिसांनी केली बेशिस्त नागरिकांवर कारवाई

जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागात अद्यापही कोरोना विषाणूची साथ बऱ्या प्रमाणात नियंत्रणात आली असून गत सहा महिन्यात ०१ हजार ९९६ जणांना कोरोना विषाणूंचा डंख झाला असून तर आज अखेर ३६ जणांचा मृत्यू झाल्याने आता परिणामस्वरूप कोपरगाव शहर पोलिसानी आता आणखी कडक कारवाईची भूमिका घेतली असून काल सकाळी ११.३० च्या सुमारास विघ्नेश्वर चौका नजीक केलेल्या कारवाईत दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामुळे बेशिस्त नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १ हजार ९९६ इतकी झाली आहे.त्यात ९० रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ३६ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा मुखपट्याविना असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.त्यामुळे हि कारवाई अटळ बनली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने कहर केला असून दोन वाजण्याच्या सुमारास आलेल्या अहवालात केलेल्या २७८ अँटीजन रॅपिड टेस्ट बाधित रुग्णांची संख्या १० झाली आहे त्यात कोपरगाव शहरातील ०४ बाधित निघाले तर ग्रामीण भागातील ०६ जण असे १० नागरिक बाधित असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १ हजार ९९६ इतकी झाली आहे.त्यात ९० रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ३६ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा मुखपट्याविना असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.आज पर्यंत मुखपट्या बांधल्याने या साथीवर चांगले नियंत्रण मिळवता येत असल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामुळेच कोपरगाव शहरात आता कोरोना रुग्णाची संख्या नियंत्रणात आली असली तरी बेशिस्त नागरिकांमुळे हि साथ कधीही डोके वर काढू शकते.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे पोलिसांना गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता कडक धोरण अवलंबले आहे.त्यातून हि कारवाई विघ्नेश्वर चौकात करण्यात आली आहे.

या कारवाईत आरोपी प्रदीप श्रीराम देशमुख वय-४४,लक्ष्मीनगर,अमोल दगडू बागुल वय-१९,रा.येसगाव,अविनाश माणिक जाधव वय-२२,हनुमाननगर,शामद महंमद शेख वय-४५,रा.संजीवनी कारखाना,शकील मुसा खाटीक वय-३८,रा.इंदिरानगर,गणेश बाबुराव काटे वय-३०,रा.निवारा,नवनाथ पाटीलबा हळवार,वय-३५,रा.महेश्वर कोळपेवाडी,जुबेर शाहबाद पठाण वय-२२,रा.दत्तनगर,समीर सलीम सय्यद वय-२२.रा.दत्तनगर,आरिफ बशीर खाटीक वय-३८,रा.१०५,कोपरगाव, आदीं दहा जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.त्यात कोरोना विषाणूची साथ चालू असतानाही तोंडाला मुखपट्या न बांधणे,चालू गाडी चालवताना फोनवर बोलणे,शासनाने व जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंदात्मक कायदा १८९७ अन्वये दिलेले आदेशाचे उल्लंघन करताना आढळून आले आहे.आदी कारणाने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी फिर्यादी पोलिस अधिकाऱ्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.७५५/२०२० भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७०, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एच.गायमुखे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close