कोपरगाव तालुका
..या गावातून दुचाकी चोरी,गुन्हा दाखल

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीतून अज्ञात चोरट्याने आपल्या घरासमोर उभी केलेली सुमारे ३५ हजार रुपये किमतीची बजाज प्लॅटिना दुचाकी (क्रमांक-एम.एच.१७ सी.जे.५५६४) चोरून नेली असल्याची फिर्याद पंढरीनाथ सुखदेव पवार (वय-४५) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात दुचाकी स्वारात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी पंढरिनाथ पवार यांनी नेहमी प्रमाणे आपली वरील बजाज कंपनीची प्लॅटिना हि दुचाकी आपल्या घरासमोर कुलूप लावून उभी केलेली असताना दि.०५ ऑक्टोबर रोजी रात्री अज्ञात चोरट्याने तिचे कुलूप तोडून ती फरार केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी पंढरिनाथ पवार यांनी नेहमी प्रमाणे आपली वरील बजाज कंपनीची प्लॅटिना हि दुचाकी आपल्या घरासमोर कुलूप लावून उभी केलेली असताना दि.०५ ऑक्टोबर रोजी रात्री अज्ञात चोरट्याने तिचे कुलूप तोडून ती फरार केली आहे.हि बाब त्यांच्या सकाळी झोपेतून उठल्यावर लक्षात आली.याबाबत त्यानी कोपरगाव तालुका पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी दु.र.क्रं.४९९/२०२० भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रभाकर काशीद हे करीत आहेत.