जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात महसूल विभागाचे नागरिकांनी काढले वाभाडे !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तहसील कार्यालयात आज आ.आशुतोष काळे यांनी आयोजित केलेल्या आमसभेत माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे व भाजपचे माजी सरचिटणीस राजेन्द्र खिलारी यांनी आज महसूल कार्यालयाच्या भोंगळ कारभारावर आज कठोर भाषेत आसूड ओढले असून नागरिकांना विनाकारण वेठीस धरले जात असून चुकीचे पिकांचे पंचनामे व पाहणी अहवाल तयार करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई कारवाई करावी अशी जोरदार मागणी या दोघांनी केली आहे.त्यांच्या मागणीला नागरिकांनी टाळ्या वाजवून समर्थन दिल्याने महसुलच्या कारभार पुन्हा एकदा टीकेचा धनी झाला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारावर आसूड ओढले व गहू तांदुळाचे बेकायदा वाहतूक करत असलेले मात्र मनसेने जप्त केलेले वाहन कोपरगावच्या पुरवठा अधिकाऱ्यांनीं सोडून दिले ? व त्याला कोणी अभय दिले ? व त्यावर कारवाईची मागणी केली.ज्या दोषी आरोपींना सोडून दिले त्यांच्यावर कारवाईची मागणी करणाऱ्या नागरिक व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची महसूल विभागाकडून धमकी दिली जाते असे म्हणून महसूल व पुरवठा विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले.त्यावर आ.काळे यांनी चौकशी करण्याचे व दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

महसूल विभाग वाळू लिलावात मंजूर वाळूसाठा व वीस-ते तीस फूट खोल उचलला वाळूसाठा याचा हिशेबच ठेवत नसल्याचे निदर्शनास आणून दिले व वाळू उपसा करताना केवळ पाटी आणि फावडे यांच्या सहाय्याने खोदाई करणे अभिप्रेत असताना जे.सी.बी.व पोकलेनच्या सहाय्याने ती कशी उचलली जाते असा सवाल महसूल विभागाला केला आहे.यात कोण-कोण सामील आहे-संजय काळे,माहिती अधिकार कार्यकर्ते.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,आज आ.काळे यांनी महसूल,भूमी अभिलेख,सहाय्यक निबंधक,दुय्यम निबंधक आदीं विभागाचा कारभाराचा आढावा घेण्यासाठी आढावा घेण्यासाठी आमसभेचे आयोजन केले होते.त्यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती पाहून आपल्या समस्या मांडल्या असून त्यात सर्वाधिक महसूल विभागाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

त्यावेळी कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,जेष्ठ संचालक पद्मकांत कुदळे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,माजी गट नेते डॉ.अजय गर्जे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,जि. प.सदस्य सुधाकर दंडवते,पंचायत समिती सदस्य श्रावण आसने,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,जिनिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले, युवा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे,सुनील शिंदे,प्रशांत वाबळे,नारायण मांजरे,नगरसेवक मेहमूद सय्यद,माजी नगरसेवक रमेश गवळी,राहुल रोहमारे,सुरेगावचे सरपंच शशीकांत वाबळे,नवाज कुरेशी,फकीर कुरेशी,नायब तहसीलदार योगेश कोतवाल,दुय्यम निबंधक दिलीप निऱ्हाळी,दुय्यम निबंधक नामदेव ठोंबळे,भूमी अभिलेख कार्यालयाचे संजय भास्कर आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी संजय काळे यांनी,”नगर-मनमाड महामार्गाची दुरवस्था याकडे लक्ष वेधले या खेरीज महसूल विभाग वाळू लिलावात मंजूर वाळूसाठा व वीस-ते तीस फूट खोल उचलला वाळूसाठा याचा हिशेबच ठेवत नसल्याचे निदर्शनास आणून दिले व वाळू उपसा करताना केवळ पाटी आणि फावडे यांच्या सहाय्याने खोदाई करणे अभिप्रेत असताना जे.सी.बी.व पोकलेनच्या सहाय्याने ती कशी उचलली जाते असा सवाल महसूल विभागाला केला आहे.यात कोण-कोण सामील आहे असा सवालही विचारला आहे.तालुक्यातील अनेक विश्वस्त संस्था या आपल्या इमारती बांधताना मंजूर एफ.एस.आय.पेक्षा मोठ्या प्रमाणात उंची इमारती बांधूनही त्यांच्यावर कारवाई न होता त्यांना वीस ते पंचवीस लाखांचा दंड करून अभय दिले जात असल्याचे निदर्शनास आणले आहे.काही महाविद्यालये रस्ता किमान बारा मिटरचा करणे आवश्यक असताना त्या संस्था केवळ दहा फुटाचे रस्ते करत आहे.तर महसूल विभाग गौण खनिजाची परवानगी नसताना त्यातून महसूल गोळा करत असल्याचे आश्चर्य व्यक्त करून ती पंचवीस ते तीस फूट खोल कशी होते व कोणाच्या परवानगीने होते ? असा सवाल विचारला आहे.गोदावरीत थेट सौचालयांचे पाणी कसे सोडले जाते त्याची पुनर्रप्रक्रिया का केली जात नाही ? असा रास्त सवाल विचारला आहे.शिर्डीचे भक्त कोपरगावात एवढी पुरातन मंदिरे असताना ते इकडे का येत नाही ? शिर्डी येथील भक्त वळविण्यासाठी का प्रयत्न होत नाही ? तालुक्यात दोन सहकारी कारखाने असताना त्यां ऊसतोड मजुरांना साखर शाळा व फिरत्या सौचालयांची सेवा का पुरविण्यात येत नाही.कोपरगावात दत्त मंदिरानजिक उभारलेली व्यायामशाळा सुरु का होत नाही.तीच बाब संवत्सर येथील अल्प बचत गटासाठी उभारण्यात आलेल्या इमारतींना कुलूप का लावण्यात आले आहे ? असे तिखट सवाल विचारले आहे.

तर राजेंद्र खिलारी यांनी,”शेतकऱ्यांच्या समस्या उचलून धरल्या व शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे का वेळेत होत नाही ? असा सवाल विचारला व इतर हक्कातील शेतकऱ्यांची नावे महसूल कर्मचारी परस्पर कशी कमी करतात व त्याचा अपिलात जाऊन नागरिकांचा छळ केला जात असल्याचे लक्षात आणून दिले आहे.व अनेक गावात सजेच्या गावी तलाठी रहात नसताना त्याकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याबद्दल कठोर शब्दात आसूड ओढले आहे.अनेक गावात अद्याप तलाठ्यांना कार्यालये नाही याकडे हि त्यांनी आ.काळे यांचे लक्ष वेधून घेतले.उसाच्या नोंदी अचूक होतात मात्र खरीप व रब्बी पिकांच्या नोंदी का होत नाहीत याकडे लक्ष वेधून घेतले आहे.त्यावेळी खिलारी यांनी भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ कारभारावरही टीका केली व ते कधीच नागरिकांच्या नोंदी,चतुर्ससीमा नोंदवत नाही व नवीन नोंदी घेत नसल्याबद्दल आक्षेप नोंदवला.शेत तळ्याच्या सर्वत्र नोंदी होतात मात्र तालुक्यात महसूल मध्ये त्या कधीच नोंद होत नाही याकडे लक्ष वेधून घेतले आहे.मात्र आ.काळे यांनी या प्रश्नावर या अधिकाऱ्यांना जाब विचारणे अभिप्रेत होते मात्र ते झाले नाही व त्यांच्यावर काय कारवाई करणार ? या कडे कानाडोळा केल्याने आश्चर्य वक्त होत आहे.या दरम्यान सुनील शिंदे,शिवाजी सदाफळ,किसन थोरात आदींनी प्रश्न उपस्थित केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारावर आसूड ओढले व गहू तांदुळाचे बेकायदा वाहतूक करत असलेले मात्र मनसेने जप्त केलेले वाहन कोपरगावच्या पुरवठा अधिकाऱ्यांनीं सोडून दिले ? व त्याला कोणी अभय दिले ? व त्यावर कारवाईची मागणी केली.ज्या दोषी आरोपींना सोडून दिले त्यांच्यावर कारवाईची मागणी करणाऱ्या नागरिक व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची महसूल विभागाकडून धमकी दिली जाते असे म्हणून महसूल व पुरवठा विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले.त्यावर आ.काळे यांनी आपण चौकशी करण्याचे व दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.त्यावर मनसेचे कार्यकर्ते शांत झाले आहे.

या बैठकीचे सुत्रसंचलन माजी नगरसेवक रमेश गवळी यांनी केले तर काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सचिन रोहमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.साडे दहा वाजता सुरु झालेली हि आढावा बैठक साडे बारा वाजता समाप्त झाली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close