कोपरगाव तालुका
कोपरगाव तहसील कार्यालयात कचऱ्याचे ढीग !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तहसील कार्यालय काही वर्षांपूर्वी सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले असले तरी आज या किमती वास्तूची केवळ स्वच्छतेअभावी दुर्दशा झाली असून तहसील इमारतीत सर्वत्र जाळे आणि केरकचऱ्याचे साम्राज्य दिसत असून हा केरकचरा थेट आमसभेस आलेले आ.आशुतोष काळे यांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याने अनेकांना या बेपर्वाईचा धक्का बसला आहे.
नागरी स्वच्छता अभियानातील राष्ट्रीय १२ पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कारांसह अन्य १३ असे एकूण १७ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत.मोठ्या राज्यांच्या मानांकनात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे.सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्राने यंदा हॅट्रीक साधली आहे.तर जिल्ह्यात शिर्डीचे नागरी स्वच्छतेत पश्चिम विभागात प्रथम तर देशात कोपरगावच्या नागरपरिषदने सतरावे स्थान पटकावले आहे.मात्र याचा कुठलेही देणेघेणे कोपरगाव तहसील कार्यालयाला असल्याचे त्यांच्या एकूणच वर्तनावरून वाटत नाही.
नागरी स्वछता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत राज्यानं यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवून महाराष्ट्राने आपली घोडदौड कायम राखली आहे.नागरी स्वच्छता अभियानातील राष्ट्रीय १२ पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कारांसह अन्य १३ असे एकूण १७ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत.मोठ्या राज्यांच्या मानांकनात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे.सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्राने यंदा हॅट्रीक साधली आहे.तर जिल्ह्यात शिर्डीचे नागरी स्वच्छतेत पश्चिम विभागात प्रथम तर देशात कोपरगावच्या नागरपरिषदने सतरावे स्थान पटकावले आहे.मात्र याचा कुठलेही देणेघेणे कोपरगाव तहसील कार्यालयाला असल्याचे त्यांच्या एकूणच वर्तनावरून वाटत नाही. तहसील आवारात याची कुठलीही लक्षणे दिसत नाही.त्यामुळे या इमारतीचे काय भवितव्य असेल याची चुकून कोणालाही दिसल्याशिवाय राहणार नाही.कोपरगाव तहसील कार्यालयाची इमारत इंग्रज काळात बांधली होती.ती जीर्ण झाल्याने तिचे गत पंचवार्षिक मध्ये तत्कालीन आ.अशोक काळे यांनी राज्य शासनाकडून सुमारे पाच कोटी रुपये मंजूर करून ती जवळपास तीन वर्षात पूर्ण करण्यात आली आहे.या विभागात वर्तमानात जवळपास पंचायत समिती,जीवन प्राधिकरण,तालुका कृषी विभाग,तहसील कार्यालयाचे सर्व विभाग,भूमी अभिलेख कार्यालय (जे नुकतेच स्थलांतरीत झाले आहे.) दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालय आदी सहा विभागाचे कार्यालये आहेत.मात्र या इमारतीची स्वच्छता मात्र कोणालाही करावी वाटत नाही.मात्र हि मुख्य इमारत हि महसूल विभागाची म्हणूनच ओळखली जाते.व या कार्यालयाची सार्व स्वच्छतेची जबाबदारी प्रमुख कार्यालय म्हणून महसूल विभागाकडे येते असल्याचे दिसून येत आहे.मात्र या पातळीवर मात्र सर्वत्र सामसूम दिसत असून त्याचा फटका आज दस्तूर खुद्द आमदार आशुतोष काळे यांनाच बसला असून आज त्यांनी आमसभा आयोजित केलेली असतानाही या इमारतीत कुठलीही स्वच्छता आढळून आली नाही.सर्वत्र कचरा.तंबाखू,गुटखे यांच्या पिचकाऱ्या व स्वच्छतागृह बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.पहिल्या मजल्यावर तर सर्वत्र अस्वच्छतेचे थैमान असल्याचे दिसून आले आहे.आमसभा संपल्यावर खाली उतरत असताना त्यांना पायऱ्याजवळ कचऱ्याचा ढीग दिसून आला आहे.याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मात्र या ठिकाणी तहसीलदार योगेश चंद्रेच उपस्थित नसल्याने पुढे या अस्वच्छतेचे दायित्व कोण घेणार हा प्रश्न अनुत्तरीतच राहिल्याचे दिसले आहे.
या बाबत आमच्या प्रतिनिधीने नायब तहसीलदार योगेश कोतवाल यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.